देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यामुळे भष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण मिळतंय; संजय राऊतांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 12:44 PM2023-04-25T12:44:04+5:302023-04-25T12:49:57+5:30

५०० कोटींचे गैरव्यवहाराचे प्रकरण मी पुराव्यानिशी दिले आहेत. मात्र त्यानंतरही कारवाई केली जात नसल्याची माहिती संजय राऊतांनी दिली.

MP Sanjay Raut has alleged that because Devendra Fadnavis became Home Minister, the corrupt got protection. | देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यामुळे भष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण मिळतंय; संजय राऊतांचा आरोप

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यामुळे भष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण मिळतंय; संजय राऊतांचा आरोप

googlenewsNext

मुंबई: मी गृहमंत्री झाल्यामुळं भ्रष्टाचार करणाऱ्यांना अडचण होत असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. म्हणून मी भीमा पाटस कारखान्याच्या गैरव्यवहाराचे प्रकरण पुन्हा त्यांच्याकडे पाठवले होते. पण त्यावर कारवाई झाली नसल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण मिळालं असल्याचा आरोपही संजय राऊतांनी यावेळी केला आहे. 

देवेंद्र फडणवीसांच्या अवतीभोवती असणाऱ्या भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना संरक्षण मिळत आहे. ५०० कोटींचे गैरव्यवहाराचे प्रकरण मी पुराव्यानिशी दिले आहेत. मात्र त्यानंतरही कारवाई केली जात नसल्याची माहिती संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शेतकऱ्यांचे पैसे लुटणाऱ्यांना पाठिशी घालू नये, असं आवाहान देखील संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना केलं आहे. 

बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा आंदोलन पेटले आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी येथील जमिनीचे सर्वेक्षण करण्यात येत असून, त्याविरोधात हजारो ग्रामस्थ बारसूमधील सड्यावर जमले आहेत. तसेच त्यांच्याकडून पोलीस आणि अधिकाऱ्यांची वाट अडवण्यात येत आहे. यावर देखील संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. बारसूमधील रहिवाशांना धमक्या दिल्या जात आहेत. तसेच हे आंदोलक तिथून हटले नाहीत तर त्यांच्यावर गोळ्यासुद्धा झाडल्या जातील आणि जालियनवाला हत्याकांडाप्रमाणे बारसूमध्येही हत्याकांड घडवलं जाईल, अशी मला भीती वाटतेय, असा दावा राऊत यांनी केला आहे. 

बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. कालपासून सुमारे ५ ते सहा हजार लोक बारसूच्या माळरानावर जमले आहेत. आम्ही मरू गोळ्या खाऊ पण मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे पोलिसांना हाताशी धरून बारसूमधील रहिवाशांवर ज्याप्रकारे खारघरमध्ये सदोष मनुष्यवध केला, त्या प्रमाणे गोळ्या चालवू, अशा धमक्या दिल्या जात आहेत. आज पाच हे सहा हजार कुटुंबं विरोध करण्यासाठी माळरानावर जमलेली आहेत. अनेक कुटुंब परागंदा झाली आहेत. अनेक कुटुंबांना पोलीस ठाण्यात बोलावून २४ तास बसवून ठेवून धमक्या दिल्या जात आहेत. बारसूमधील हजारो ग्रामस्थांना तडीपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

Web Title: MP Sanjay Raut has alleged that because Devendra Fadnavis became Home Minister, the corrupt got protection.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.