Join us  

'तुमचा नाग तिथे फणा का काढत नाही?'; शिंदे गट, फडणवीस अन् भाजपावर संजय राऊतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2022 2:28 PM

खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर टीका केली आहे.

मुंबई- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि भाजपाजे प्रवक्त्यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला आहे.

मला जर कोणी गद्दार शिव्या देत असतील तर तो माझा मी सन्मान समजतो. खर म्हणजे त्यांना जर उत्तम शिव्या देता येत असतील तर त्यांनी सगळ्यात आधी छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल, प्रवक्ते, मंत्री यांना द्याव्यात. आम्ही त्या शिव्या देणाऱ्यांवरती फुले उधळू, आम्ही त्यांना संधी देतोय, असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे गटातील आमदारांवर टीका केली. 

छत्रपती उदयनराजे ज्या पक्षाचे आहेत त्याच पक्षाकडून अपमान झाला आहे, तरीही तो पक्ष अजूनही माफी मागायला तयार नाही. नूपुर शर्मा यांनी मागे विधान एक वादग्रस्त विधान केले होते, त्याला आम्ही विरोध केला होता, संपूर्ण देशात विरोध सुरू झाल्याने त्यांना पक्षातून काढून टाकले होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करूनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय प्रवक्ते त्रिवेदी यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले नाही असं म्हटले असले तरी त्यांनी निषेध व्यक्त केला नाही. त्यांनी याबाबत खुलासा करणं म्हणजे नामर्दपणा असल्याचं संजय राऊत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावण म्हटल्यावर तुमची अस्मिता जागी होते. मग महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान केल्यावर तुमची अस्मिता थंड का पडते, तिथे तुमचा नाग फणा का काढत नाही, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वात आज किल्ले रायगड येथे  निर्धार शिवसन्मानाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थितांना संबोधताना खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाची घोषणा त्यांनी केली. या आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :संजय राऊतएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस