Sanjay Raut: पुन्हा अटक होणार का? संजय राऊतांनी स्पष्टचं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 05:38 PM2022-11-28T17:38:09+5:302022-11-28T18:05:05+5:30

कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला.

MP Sanjay Raut reacts to the talk of arrests by the Karnataka police | Sanjay Raut: पुन्हा अटक होणार का? संजय राऊतांनी स्पष्टचं सांगितलं

Sanjay Raut: पुन्हा अटक होणार का? संजय राऊतांनी स्पष्टचं सांगितलं

Next

कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला. मुंबईच्या पीएमएलए न्यायालयाने संजय राऊतांचा जामीन मंजूर केला. आता पुन्हा संजय राऊतांना अटक होणार असल्याचे बोलले जात आहे, यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

खासदार संजय राऊत यांना बेळगाव कोर्टाने समन्स बजावले आहे. १ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. हजर न राहिल्यास संजय राऊत यांना बेळगाव पोलीस अटक करु शकतात.  ३० मार्च २०१८ रोजी संजय राऊत यांनी बेळगावात एक भाषण केले होते, हे भाषण प्रक्षोभक होते, असा आरोप कर्नाटक पोलिसांनी केला आहे. 

'शिवरायांवर वक्तव्य करणाऱ्यांचा राग का येत नाही?, छत्रपती उदयनराजे संतापले

"लोकांवर अन्याय केला तर महाराष्ट्रात याचे पडसाद उमटतील या वाक्यात प्रक्षोभक काय आहे, २०१८ मध्ये बेळगावात केलेल्या भाषणावर मला आता कर्नाटक पोलिसांची नोटीस आली आहे. मला कायदेशी बाबीत अडकवून ठेवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. 

"मला अटकेची भिती नाही, मला महाराष्ट्रासाठी अटक करणार असतील तर मी स्वत: जाईन. महाराष्ट्राविषयी कर्नाटक कोंडी करत आहे. शिवसेना सीमा बांधवांसाठी वचनबद्ध आहे. मला आता कर्नाटकात अटक होऊ शकते. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे, असंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. 

'शिवसेना घाबरणार नाही, मी आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे आणि मी या संदर्भात ठरवणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्नाटकवर बोलले आहेत. पण, या बोलण्यात काही दम नाही, असंही संजय राऊत म्हणाले.

Web Title: MP Sanjay Raut reacts to the talk of arrests by the Karnataka police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.