Sanjay Raut: 'माझा मुलगा...'; संजय राऊतांना जामीन मंजूर, मातोश्रींनी दिली पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 02:31 PM2022-11-09T14:31:44+5:302022-11-09T14:32:15+5:30

संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत गेल्या १०० दिवसांपासून होते.

MP Sanjay Raut's mother has reacted that my son is coming, I am happy. | Sanjay Raut: 'माझा मुलगा...'; संजय राऊतांना जामीन मंजूर, मातोश्रींनी दिली पहिली प्रतिक्रिया

Sanjay Raut: 'माझा मुलगा...'; संजय राऊतांना जामीन मंजूर, मातोश्रींनी दिली पहिली प्रतिक्रिया

Next

मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांना आज पत्राचाळप्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटात मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जामीन मिळाल्यानंतर संजय राऊतांच्या घरी जल्लोषाची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे.

संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत गेल्या १०० दिवसांपासून होते. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर त्यांना आज जामीन मंजूर केला आहे. संजय राऊतांना जामीन मंजूर होताच त्यांच्या मातोश्रींनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा मुलगा येतोय, आनंद आहे, असं संजय राऊतांच्या मातोश्रींनी म्हटलं आहे. 

संजय राऊतांना जामीन मंजूर झाला, मात्र आता पुढे काय?; ३ वाजता आणखी एक महत्वाचा निर्णय

न्यायालयाच्या या निर्णयावर ईडीच्या वकिलांनी आक्षेप घेत. संजय राऊतांच्या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. ईडीच्या वकिलांच्या मागणीनंतर विशेष कोर्टाकडून राऊत यांची सुटका करण्याबाबतच्या निर्णयावर आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास स्थगितीबाबत विशेष न्यायालय निर्णय सुनावणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे आता सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

काय आहे प्रकरण? 

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना  खासदार संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी रात्री उशिरा ईडीने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊत यांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून संजय राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला. प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते.   

नेमका ईडीचा दावा काय?

दरम्यान, ईडीने केलेल्या दाव्यानुसार जीएपीसीएलने बेकायदेशीर कारवाईमधून १,०३९.७९ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. प्रविण राऊत यांना एचडीआयएलकडून १०० कोटी रुपये मिळाले. हे पैसे नंतर वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये वळवण्यात आले. ही खाती प्रविण राऊत यांच्या जवळचे, कुटुंबातले सदस्य आणि व्यावसायिकांची आहेत. ज्यात संजय राऊत यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे, असं इडीने सांगितले. २०१० साली संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांच्या खात्यात प्रविण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी ८३ लाख रुपये जमा केले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: MP Sanjay Raut's mother has reacted that my son is coming, I am happy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.