"विधानसभा निवडणुका आहेत, खात्रीलायक माहिती..." शरद पवारांची झेड प्लस सुरक्षेवरच शंका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 09:32 PM2024-08-22T21:32:25+5:302024-08-22T21:32:48+5:30
Sharad Pawar : केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी खासदार शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sharad Pawar ( Marathi News ) :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP-SP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना केंद्राने Z+ दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) अनुषंगाने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. पवारांना सध्या राज्याची झेड प्लस दर्जाची सुरक्षा आहे, मात्र आता त्यांना केंद्राची Z+ प्लस सुरक्षा देण्यात आली आहे, यावर आता खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
"देशात तीन लोकांना Z+ सुरक्षा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याच्यात एक मला, आणि दुसरी आरएसएस चे भागवत आणि देशाचे गृहमंत्री यांचही नाव आहे. आता ही सुरक्षा कशासाठी दिली याची माहिती नाही. पण कदाचित निवडणुका आहेत यावेळी ऑथेंटीक माहिती मिळवण्याची व्यवस्थाही असू शकते, नक्की काय आहे मला माहिती नाही, असंही खासदार शरद पवार म्हणाले.' होममिनिस्ट्री आहे त्यांच्याशी मी संवाद साधणार आहे. याची माहिती घेणार असून त्याच पुढ काय करायचं ते ठरवणार आहे, असंही पवार म्हणाले.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे वेगवेगळ्या जिल्ह्यांत दौरे सुरू झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी पवारांनी मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी भेट घेतली होती, त्यावेळी रस्त्यात काही आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. तसेच, आगामी काळात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पवारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता.
केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी आढावा घेतल्यानंतर शरद पवारांना Z+ प्लस सुरक्षा देण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार, त्यांना केंद्राची Z+ दर्जाची सुरक्षा पुरवण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले. यलो बुक ऑफ सिक्युरिटीनुसार शरद पवारांना Z+ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. या सुरक्षेअंतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) 55 सशस्त्र जवानांचे पथक शरद पवारांच्या सुरक्षेत तैनात असेल.