Anjali Damania Sharad Pawar : मुंबई- बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू आहे, अजित पवार बारामतीत प्रचारसभेत बोलताना म्हणाले होते की, "तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या मागे उभे राहिलात, त्यामुळे जिथं पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं. यावर "शरद पवार यांनी म्हटलं की बारामतीकरांनी पवारांच्या पाठिशी उभं राहायला हवं. यात चूक काय आहे? दोन गोष्टी असतात, एक मूळ पवार आणि दुसरे बाहेरून आलेले पवार",शरद पवार यांच्या या वक्तव्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शरद पवार यांना सवाल उपस्थित केला.
मूळ पवार व बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक व्हिडीओ ट्विट करुन खासदार शरद पवार यांना सवाल उपस्थित केला. "शरद पवार यांचं आताच एक विधान आलं आहे, 'मूळ पवार आणि बाहेरुन आलेला पवार' म्हणजे यातून त्यांना काय म्हणायचं आहे. जर एखादी सून तीस वर्ष, चालीस वर्ष लग्न होऊन घरी आलेली असली तरी ती घरची होत नाही, ती बाहेरची राहते. हे त्यांचं बोलन मला अजिबात पटलेलं नाही, अशी टीका अंजली दमानिया यांनी केली.
"खरतर त्यांचा एक व्हिडीओ आला होता, त्यात त्यांना एकच मुलगी आहे. यावरुन प्रश्न केला होता, यावर त्यांनी आपले विचार पाहिजे, मुलीला मुलासारखी ट्रिकमेंट देऊन तिला दाकदवान बनवलं पाहिजे, हे त्यांचे विचार ऐकून मला बरं वाटलं होतं, किती प्रगतशील विचार आहेत. पण, कुठेतरी हे विधान होतं, मला पसंत नाही, आता ज्या सूना आहेत त्यांना हे विधान आवडणार नाही, असंही अंजली दमानिया म्हणाल्या.
शरद पवार काय म्हणाले होते?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुणे इथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील मेळाव्यात केलेल्या वक्तव्यांचाही समाचार घेतला. "अजित पवार यांनी म्हटलं की बारामतीकरांनी पवारांच्या पाठिशी उभं राहायला हवं. यात चूक काय आहे? दोन गोष्टी असतात, एक मूळ पवार आणि दुसरे बाहेरून आलेले पवार," असं म्हणत सुप्रिया सुळे याच मूळ पवार असल्याचं शरद पवारांनी सुचवल्याने पत्रकार परिषदेत चांगलाच हशा पिकला.
बारामतीत पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना अजित पवार म्हणाले होते की, "तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या मागे उभे राहिलात, त्यामुळे जिथं पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं. त्यामुळे आपली परंपरा खंडित केली अशी भावना कुणाच्या मनात येणार नाही," असं म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शरद पवारांनी आज सुप्रिया सुळे याच मूळ पवार असून सुनेत्रा पवार तर बाहेरून आल्या असल्याचं अप्रत्यक्षरित्या सांगितलं.