Join us

'माझा आणि हिमंतांचा डीएनए काँग्रेसचा होता, पण...;, गाझाला पाठवण्याच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 1:20 PM

खासदार शरद पवार यांनी हमास-इस्त्रायल युद्धावर केलेल्या विधानावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

मुंबई- इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू आहे. या युद्धावर खासदार शरद पवार यांनी एक विधान केले. यामुळे आता राजकीय वर्तुळात आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, रविवारी राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात खासदार शरद पवार यांनी युद्धाच्या मुद्द्यावरुन भारत सरकारच्या भूमिकेबद्दल म्हणाले होते, मला वाटत नाही की भारत सरकार इस्रायलला १०० टक्के पाठिंबा देत आहे. भारत सरकारचे अधिकृत विधान पाहिल्यास, भारत सरकार इस्रायलसोबत १००% नाही. त्यांच्या वक्तव्यावरून असे दिसते पण पंतप्रधानांच्या वक्तव्यावरून ते इस्रायलसोबत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. या प्रकरणी कोणताही निर्णय घेताना सरकारने अफगाणिस्तान, इराण, यूएई आणि आखाती देशांकडे दुर्लक्ष करू नये, असंही पवार म्हणाले होते. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही जोरदार टीका केली आहे.  

हमासला पाठिंबा देण्यासाठी शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना गाझाला पाठवावे; पवारांच्या वक्तव्यावर हिमंता सरमांचे प्रत्युत्तर

हिमंता सरमा म्हणाले होते की, शरद पवार यांनी त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना गाझामध्ये हमाससाठी लढायला पाठवावे. यावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,हिमंता सरमा यांच्या वक्तव्यामुळे मला आश्चर्य वाटले. माझा आणि हिमंता बिस्वा सरमा यांचा डीएनए एकच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोघेही यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. 'काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेला त्यांचा एक मित्र भाजपमध्ये गेल्याने मुख्यमंत्री झाल्याचा त्यांना आनंद झाला.' भाजपवर निशाणा साधत सुप्रिया म्हणाल्या की, भाजपमध्ये महिलांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. भाजपच्या आयटी सेलला शरद पवार काय म्हणाले आहेत हे समजून घेण्याची गरज आहे, असंही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

इस्रायल-पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात सुरू झालेल्या या राजकीय गदारोळात एकीकडे भाजप इस्रायलच्या पाठीशी उभा असल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे बहुतांश बिगर भाजप पक्ष पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ उघडपणे वक्तव्ये करत आहेत. खासदार शरद पवार यांच्यावर नाराज असलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल भाष्य केले होते. सरमा म्हणाले होते की, 'मला वाटते शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना गाझामध्ये हमाससाठी लढायला पाठवतील, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 

टॅग्स :सुप्रिया सुळेराष्ट्रवादी काँग्रेस