अनिल देशमुखांना न्यायालयाकडून जामीन मंजूर; सुप्रिया सुळेंची दोन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 03:26 PM2022-10-04T15:26:17+5:302022-10-04T15:43:17+5:30
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला असून, त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ईडीच्या गुन्ह्यातून त्यांना जामीन दिला आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला असून, त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ईडीच्या गुन्ह्यातून त्यांना जामीन दिला आहे. परंतु सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात मात्र त्यांना जामीन मिळालेला नाही, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
" फायनली सत्याचा विजय झाला आहे. सत्यमेव जयते, संजय राऊत, नवाब मलिक तसेच बाकीच्या सगळ्यांना आता न्याय मिळेल. त्यांनाही जामीन मिळेल. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिली.
Anil Deshmukh : अनिल देशमुखांना न्यायालयाकडून जामीन मंजूर, तुरूगांतून बाहेर येणार का?
पंतप्रधान मोदींकडे चौकशीची मागणी करणार
"१० कोटींची कॅश भरलेली बॅग सापडल्याचे माझ्या वाचनात आले आहे, मी ही गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निदर्शनात आणून देणार आहे. या दहा कोटींच्या नोटा आल्या कुठून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केला.
न्यायालयाने आमचा युक्तीवाद मान्य केला
उच्च न्यायालयात आम्ही असा युक्तीवाद केला होता की, ईडीच्या तपासात कुठेही दिसत नाही अनिल देशमुखांच्या म्हणण्यावरुन वसुली होत होती. या संदर्भात कुठलाही कागदोपत्री सबळ पुरावा नाही, त्यामुळे त्यांना जेलमध्ये ठेवणे कायद्याने योग्य नाही. हा युक्तीवाद न्यायालयाने मान्य केला. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांच्या वकीलांनी दिली.
नुकतेच सर्वोच्च न्यायालयानंअनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आठवड्याभरात सुनावणी घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाला दिले होते. सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी आपल्या बाजू न्यायालयासमोर मांडल्या. अनिल देशमुख यांचं वय ७२ वर्षे आहे आणि त्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा असं अनिल देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी आणि अनिकेत निकम यांनी न्यायालयामोर सांगितलं. दरम्यान, त्यांना आता १ लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.