शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव; संभाजीराजेंनंतर आता उदयनराजेंनीही केलं ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 12:09 PM2022-06-11T12:09:50+5:302022-06-11T12:14:55+5:30
खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत भाजपाच्या विजयी उमेदवारांचे कौतुक केलं आहे.
मुंबई- राज्यसभा निवडणुकीत शुक्रवारी मध्यरात्री मोठे राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. ९-१० तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले. तर भाजपाचे देखील तीन उमेदवार विजयी झाले आहे. शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला. पहिल्या फेरीत संजय पवार यांना ३३ मते मिळाली होती. तर, धनंजय महाडिकांना २७ मते मिळाली आहेत. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. धनंजय महाडिकांना ४१ मते मिळाली.
रात्रीस खेळ चाले; विधानभवनात मतमोजणीवेळी नेमकं काय घडलं?... एका क्लिकवर
शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराच्या पराभवानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली. वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll, असं संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे. त्यानंतर आता खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत भाजपाच्या विजयी उमेदवारांचे कौतुक केलं आहे.
भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मा. श्री. पियुषजी गोयल, मा. डॉ. अनिलजी बोंडे व मा. श्री. धनंजय महाडिक हे राज्यसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! pic.twitter.com/PLGN5DaXw3
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) June 11, 2022
राज्यसभेच्या निकालानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाने काल जो घोडेबाजार केला, तो राज्यातील सर्व जनतेने पाहिला. काहींवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणण्यात आला. काही ठिकाणी इतर काही व्यवहार आहे. ठीक आहे आज ते जिंकले असतील. पण आम्ही उद्या पाहू, असं संजय राऊत म्हणाले.
बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमान पक्षाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी शिवसेनेला मतं दिली नाहीत, ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली, त्यांची यादी आमच्याकडे आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
आता विधान परिषदेची रंगणार निवडणूक; उरले फक्त ९ दिवस, महाविकास आघाडीत चिंता https://t.co/mIJ0M1jLSH
— Lokmat (@lokmat) June 11, 2022