शिक्षण हक्क नियमावलीत सुधारणा विरोधात एमपीजे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 07:40 PM2024-02-27T19:40:01+5:302024-02-27T19:40:26+5:30
मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीसचे मुंबई अध्यक्ष रमेश कदम यांच्या पुढाकाराने मुंबईतील विविध सामाजिक संस्था संघटना यांनी एकत्रित येऊन शिक्षण हक्क समिती स्थापन केली आहे.
श्रीकांत जाधव
मुंबई: आरटीई अंतगर्त २५ टक्के राखीव जागांवर वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना मोफत शिक्षण बंद करण्याच्या नियमातील दुरुस्तीच्या विरोधात मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस ( एमपीजे ) च्या नेतृत्वाखाली मंगळवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, खासदार भालचंद्र मुगणेकर यांनी आंदोलनकाना भेट दिली.
मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीसचे मुंबई अध्यक्ष रमेश कदम यांच्या पुढाकाराने मुंबईतील विविध सामाजिक संस्था संघटना यांनी एकत्रित येऊन शिक्षण हक्क समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून बालकांच्या सक्तीच्या व मोफत शिक्षण अधिकार कायदा २००९ मध्ये केलेले संशोधन रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी आरटीई नियमावली मध्ये राज्यव्यापी दुरुस्तीला एमपीजेने विरोध दर्शविला असून आरटीईच्या नियमांमध्ये नुकत्याच झालेल्या सुधारणांचा सर्वसमावेश शिक्षण मिळण्यास मोठा अडथळा निर्माण होणार असल्याचे ही कदम यांनी सांगितले.