Uddhav Thackeray on MPSC Exam: येत्या आठवडाभरात MPSC परीक्षा घेणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 08:50 PM2021-03-11T20:50:06+5:302021-03-11T21:02:46+5:30
MPSC Exam CM Uddhav Thackeray: १४ मार्चला ही परीक्षा होणार होती, मग परीक्षा पुढे करण्यात आली आणि पुढे करण्यात आले तरी किती दिवस करण्यात येणार आहे याबाबत संभ्रम आहे, परंतु येत्या आठवडभरात ही परीक्षा घेण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
मुंबई – गेल्यावर्षी दिवाळीच्या वेळी MPSC परीक्षांची तारीख पुढे ढकलण्यात आली होती, तेव्हा मी सांगितलं होतं, यापुढे परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाहीत, आताची १४ मार्चची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, परंतु ही तारीख ८ दिवसांच्या कालावधीतील असेल, येत्या आठवडाभरात ही परिक्षा होईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. (CM Uddhav Thackeray Statement on MPSC Exam Postponed)
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आपल्याशी साधारण रविवारी संवाद साधतो, आता हा संवाद काही जणांना आवडतो काहींना आवडत नाही पण मी मात्र माझं कर्तव्य या माध्यमातून करत आलो आहे आणि करत राहणार. आज राज्यात वातावरण निर्माण केलंय त्याबद्दल मला स्पष्टीकरण द्यायचं आहे, एमपीएससीच्या(MPSC Exam) परीक्षांबाबत आपल्याला आठवत असेल की गेल्या वर्षी दिवाळीच्या आधी या परीक्षांची तारीख जाहिर झाली होती आणि नंतर ती पुढे ढकलण्यात आली, तेव्हाच मी आपल्याला सांगितलं होतं, यापुढे ही तारीख जाहीर होईल तेव्हा ती कोणत्याही कारणाने पुढे ढकलली जाणार नाही. १४ मार्चला ही परीक्षा होणार होती, मग परीक्षा पुढे करण्यात आली आणि पुढे करण्यात आले तरी किती दिवस करण्यात येणार आहे याबाबत संभ्रम आहे, परंतु येत्या आठवडभरात ही परीक्षा घेण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच विद्यार्थी अनेक दिवस अनेक महिने परिश्रम सतत अभ्यास करतात त्यांच्या भावनेशी सहमत आहे. १४ तारखेची परीक्षा पुढे केलेली आहे ती महिना-दोन महिने, तीन महिन्यासाठी नाही तर केवळ काही दिवसांसाठी करण्यात आली आहे. मी स्वतः मुख्य सचिवांना आणि एमपीएससी च्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की या तारखांबद्दल जो काही घोळ झालेला आहे तो लवकर संपवा आणि तारीख उद्यापर्यंत जाहीर करा असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
जो अभ्यास करताय तो करत राहा
आपण जो अभ्यास करतात तो अभ्यास करत राहा आणि मी तुम्हाला वचन देतो आहे की येत्या आठवडाभरात ही परीक्षा होईल. या परीक्षेसाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा कार्यरत असते, त्याच्यामध्ये काही शासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या आरोग्याबाबतही काळजी घ्यावी लागणार आहे. त्यांना बसण्याची सोय कुठे आहे. ती व्यवस्था कशी आहे त्याच्यानंतर पेपर वाटणारा पेपर गोळा करण्याच्या पेपरचे गठ्ठे बांधून मधल्या काळात परीक्षेचा पेपर देत असताना निरीक्षण करणाऱ्याला काय हवं नको ते बघणं या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी कर्मचारी वर्ग लागतो. कोरोनाचा राक्षस पुन्हा डोकं वर काढतोय तो काढत असताना जे कर्मचारी माझ्या विद्यार्थ्यांच्या सोबत असतील त्यांची तपासणी करणं गरजेचे आहे, निगेटिव्ह असलेली कर्मचारी या परीक्षेसाठी कार्यरत असावेत हा माझा आग्रह या माझ्या सूचना आहे, त्यामुळे विद्यार्थी परीक्षेला आल्यानंतर तो कोणत्याही परिस्थितीत दडपणाखाली येऊ नये, आपल्याला पेपर वाटणारे हात कोरोनाबाधित नसेल ना अशी शंका मनात असता कामा नये म्हणूनच ही तारीख पुढे ढकलण्याची आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.