Join us

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर काय बोलणं झालं? विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 5:42 PM

MPSC Exam Issue Uddhav Thackeray : विद्यार्थ्यांचा वाढता रोष लक्षात घेता याची दखल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

राज्यात एमपीएमसीच्या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्यानं पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूरमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. विद्यार्थ्यांचा वाढता रोष लक्षात घेता याची दखल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा केली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेची सविस्तर माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. 

"हे सरकार आमच्या आयुष्याशी खेळत आहे!"; पुण्यात 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट 

"एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा रोष अतिशय योग्य आहे. याबाबत माझं मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं झालं आहे. त्यांनी लवकरच याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच ते स्वत: याबाबतची पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करणार आहेत", असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. ( Vijay Wadettiwar Talks CM Uddhav Thackeray on Phone Over MPSC Exam Isuue)

MPSC च्या वेळापत्रकाबाबत सरकारला कल्पना नाही"एमपीएससीचं वेळापत्रक जाहीर करताना सरकारला विचारात घेण्यात आलं नव्हतं. त्यामुळे सरकारला याबाबत कोणतीही कल्पना देखील देण्यात आली नव्हती", असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. 

मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणारराज्यात एमपीएससी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारनं याची गंभीर दखल घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री याबाबत सविस्तर चर्चा करत असून ते स्वत: पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.  

टॅग्स :विजय वडेट्टीवारउद्धव ठाकरेएमपीएससी परीक्षापुणे