Join us

‘एमपीएससी’चे सुधारित वेळापत्रक जाहीर; पुढील दोन महिन्यांत होणार महत्त्वाच्या तीन परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 1:58 AM

वेळापत्रकानुसार, अभियांत्रिकी पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आलेला नाही.

मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) तीन परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार आता राज्यसेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर २०२० रोजी, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २२ नोव्हेंबर, तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर रोजी होईल.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या एप्रिल/मे २०२० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन परीक्षा कोरोना संसर्ग व लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत निर्णय झाल्यानंतर त्या अनुषंगाने आता सुधारित नवे वेळापत्रक आयोगाने जारी केले आहे. या वेळापत्रकानुसार, अभियांत्रिकी पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आलेला नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने तसेच उमेदवार व परीक्षा आयोजनातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आयोगाकडून सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. यासंदर्भातील माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

...म्हणून ही परीक्षा गेली आणखी पुढे

दुय्यम सेवा अराजपत्रित गट ही परीक्षा नीटसोबत होणार होती. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने ती लांबणीवर पडली. आता ती आणखी लांबणीवर गेली आहे. सप्टेंबरमध्ये कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर परीक्षांचे आयोजन न करता ते आता आॅक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत पुढे गेले आहे.

टॅग्स :परीक्षाशिक्षण