महावितरण भांडुप परिमंडल - चक्रीवादळ : वीज यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:06 AM2021-05-17T04:06:02+5:302021-05-17T04:06:02+5:30

मुंबई : ताउते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज ठेवण्यात आली आहे. महावितरण भांडुप परिमंडलचे अधिकारी ...

MSEDCL Bhandup Circle - Cyclone: Power system ready | महावितरण भांडुप परिमंडल - चक्रीवादळ : वीज यंत्रणा सज्ज

महावितरण भांडुप परिमंडल - चक्रीवादळ : वीज यंत्रणा सज्ज

googlenewsNext

मुंबई : ताउते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज ठेवण्यात आली आहे. महावितरण भांडुप परिमंडलचे अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर काम करण्यासाठी सज्ज आहेत. यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी वाशी मंडळात २५ एजेंसी (एकूण मनुष्यबळ २८२), पेण मंडळात ३१ (एकूण मनुष्यबळ ४९९) तर ठाणे मंडळात ४८ (एकूण मनुष्यबळ ६००) असे एकूण १०४ एजन्सीसना (एकूण मनुष्यबळ १,३८१) नियुक्त करण्यात आले आहेत.

सर्व एजन्सीसना आवश्यक मनुष्यबळ, सामग्री व वाहनांसह तयार राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी भांडुप परिमंडलात १,९५५ तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, यामध्ये वाशी मंडळात ७३०, पेण मंडळात ५०७, ठाणे मंडळात ७१८ तांत्रिक कर्मचाऱ्यांना समावेश आहे. याशिवाय १,१०३ बाह्यस्रोत तांत्रिक कर्मचारी असून, वाशी मंडळात ३९८, पेण मंडळात ३९०, ठाणे मंडळात ३१५ बाह्यस्रोत तांत्रिक कर्मचारी आहेत, तसेच आपत्कालीन स्थितीत कामासाठी वाशी मंडळात २३ वाहन, पेण मंडळात ३८, ठाणे मंडळात ३३ असे एकूण ९४ वाहन तैनात केले आहेत.

Web Title: MSEDCL Bhandup Circle - Cyclone: Power system ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.