Join us

नवीन महाबळेश्वरसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएसआरडीसीची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:17 IST

चार तालुक्यातील ५२९ गावांसाठी काम करणार

अमर शैलामुंबई : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाच्या शेजारीच कोयना बॅकवॉटरला लागून असलेल्या नवीन महाबळेश्वर गिरीस्थान प्रकल्पात आणखी २९४ गावांचा समावेश करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) महाबळेश्वर, पाटण, सातारा, जावळी या तालुक्यांतील ५२९ गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम करील.यापूर्वी नवीन महाबळेश्वर गिरीस्थानात समाविष्ट केलेल्या २३५ गावांच्या अधिसूचित क्षेत्रानजीक असलेल्या आणखी २९४ गावांचाही या प्रकल्पात समावेश करण्यात आला. या २९४ गावांचे एकूण क्षेत्रफळ ९४ हजार ४०४ हेक्टर म्हणजेच ९४४ चौ. किमी एवढे आहे, तर यापूर्वीच्या २३५ या गावांचे एकूण क्षेत्र १,१५,३०० हेक्टर एवढे आहे.या नव्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने साताऱ्यातील ५२९ गावांतील २,०९,७०० हेक्टर म्हणजेच तब्बल २०९७ चौ. किमी क्षेत्रासाठी एमएसआरडीसी नियोजन प्राधिकरण असेल. आता एमएसआरडीसीकडून या भागाचा विकास आराखडा बनविण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोणत्या तालुक्यातील किती गावे?जावळी - ४९पाटण - १९३सातारा - ५२

आराखडा लवकरच अंतिमसातारा जिल्ह्यातील २३५ गावांतील ११५३ चौ. किमी क्षेत्रफळावर हे गिरीस्थान उभारण्यासाठी प्रारूप विकास आराखडा यापूर्वीच नागरिकांच्या सूचना, हरकतींसाठी एमएसआरडीसीने जाहीर केला होता. त्यावर सुनावणी पूर्ण झाली आहे. तो लवकरच अंतिम केला जाईल. या २३५ गावांमध्ये रोपवे, घाटमाथा रेल्वे, सायकल ट्र्रॅक, फर्निक्युलर रेल्वे यांच्या विकासासह टुरिस्ट पॅराडाइज, पर्यटन आणि निसर्ग संपदा विकास केंद्र प्रस्तावित केले आहे. त्यातून भागातील पर्यटनाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

टॅग्स :सातारा परिसरमहाबळेश्वर गिरीस्थानपर्यटन