मुंबई : महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) कर्मचाऱ्यांना अखेर जून महिन्याचे वेतन मिळाले आहे. वेतन रखडल्याने आर्थिक परिस्थितीशी झगडत असलेल्या कर्मचा-यांना व अधिकाºयांना बुधवारी वेतन मिळाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, जुलै महिन्याचे वेतन कधी मिळणार, याबाबत अद्याप काहीही माहिती देण्यात आली नसून हे वेतनही लवकरात लवकर द्यावे, अशी कर्मचाºयांची मागणी आहे.एमटीएनएलची आर्थिक स्थिती खालावलेली असल्याने, गेल्या काही महिन्यांपासून एमटीएनएल कर्मचाºयांना प्रत्येक महिन्याचे वेतन उशिराने मिळत आहे. जून महिन्याचे वेतन मिळण्यासाठी त्यांना थेट आॅगस्ट महिन्याची प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये तीव्र नाराजी आहे. वेतनासाठी एमटीएनएलच्या कामगार संघटनांतर्फे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर, बुधवारी त्यांना जूनचे वेतन मिळाले आहे, परंतु जुलै महिन्याचे वेतन नेमके कधी मिळणार, याबाबत साशंकता आहे. जुलैचे वेतन लवकर मिळावे, अशी कर्मचाºयांची मागणी आहे. एमटीएनएल व बीएसएनएल वाचविण्यासाठी दूरसंचार विभागाकडे पुनरुज्जीवनची योजना तयार करून सादर केली आहे. स्वेच्छानिवृत्ती व निवृत्तीचे वय कमी करण्याच्या मुद्द्यांना कामगारांचा विरोध आहे.पुनरुज्जीवनासंदर्भातील प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर येणारएमटीएनएल व बीएसएनएल पुनरुज्जीवनासंदर्भातील प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर येणार असून, मंत्रिमंडळात हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी ‘लोकमत’ला दिली.
एमटीएनएल कर्मचाऱ्यांना अखेर जूनचे वेतन मिळाले, प्रत्येक महिन्याला उशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 4:05 AM