एमटीएनएल कर्मचारी वेतनाविना त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 03:15 AM2019-06-17T03:15:38+5:302019-06-17T06:39:28+5:30

गेल्या सात-आठ महिन्यांपासून एमटीएनएल कर्मचाऱ्याना दर महिन्याला वेतनाचा गंभीर प्रश्न भेडसावू लागला आहे.

MTNL employees suffer without salary | एमटीएनएल कर्मचारी वेतनाविना त्रस्त

एमटीएनएल कर्मचारी वेतनाविना त्रस्त

Next

मुंबई : महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल)च्या कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन अद्याप झालेले नसल्याने, कर्मचाऱ्यांमधून प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या सात-आठ महिन्यांपासून एमटीएनएल कर्मचाऱ्याना दर महिन्याला वेतनाचा गंभीर प्रश्न भेडसावू लागला आहे. मे महिन्याचे वेतन १८ जून रोजी अदा करण्यात येईल, असे परिपत्रक प्रशासनातर्फे काढण्यात आले आहे.

पूर्वी दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला वेतन होत असल्याने, एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित त्याप्रमाणे ठरत असे. मात्र, आता दर महिन्याच्या हक्काच्या वेतनासाठी कर्मचाºयांना किमान १५ ते २० दिवस प्र्रतीक्षा करावी लागत असल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत. एमटीएनएलच्या वरिष्ठ पातळीवर याबाबत अनेकदा आवाज उठविण्यात आला असला, तरी हा प्रश्न कायमचा निकाली लावण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे त्याचा थेट फटका कर्मचाऱ्यांना दर महिन्याला बसू लागला आहे. वेतन झाल्यावर घराचा हप्ता, वाहन कर्ज यासह विविध कर्जांचे हप्ते त्यामधून भरले जात असत. अनेक कर्मचाऱ्यांची पाल्ये शाळा, महाविद्यालयात असल्याने त्यांच्या शैक्षणिक शुल्काची पूर्ती करण्यासाठी कर्मचाºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मे महिन्याचे वेतन १८ जूनला करण्याबाबत एमटीएनएलच्या कॉर्पोरेट कार्यालयातून उप महाव्यवस्थापक (बँकिंग) यांनी परिपत्रक जारी केले आहे. या प्रश्नी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा व वेतनाचा दर महिन्याला उद्भवणारा प्रश्न निकालात काढावा, अशी मागणी कर्मचाºयांतून होत आहे. दर महिन्याला वेतनाचा प्रश्न समोर उभा राहत असल्याने, कर्मचाºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: MTNL employees suffer without salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.