‘एमटीएनएल’च्या वेतनाचा तिढा कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 12:52 AM2019-01-30T00:52:23+5:302019-01-30T00:52:37+5:30
गेल्या दोन महिन्यांपासून वेतनाचा गोंधळ झालेल्या एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा कायम राहिला आहे.
मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून वेतनाचा गोंधळ झालेल्या महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल)च्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा कायम राहिला आहे. प्रत्येक महिन्याचे वेतन पुढील महिन्याच्या १ तारखेला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र प्रत्यक्षात किती तारखेला वेतन होणार हे दर महिन्याला नोटीसद्वारे सांगण्यात येईल, असे पत्र एमटीएनएलच्या कॉर्पोरेट कार्यालयातर्फे मुंबई व दिल्लीच्या कार्यकारी संचालकांना पाठविण्यात आले आहे.
जानेवारी महिन्याचे वेतनदेखील ३१ जानेवारीला होणार नसून १ फेब्रुवारीला त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पत्रक प्रशासनाने काढले आहे. त्यामुळे एमटीएनएलच्या कर्मचारी व अधिकाºयांमध्ये नाराजी पसरली आहे. जाणीवपूर्वक हा प्रकार केला जात असल्याची चर्चा कर्मचाºयांमध्ये रंगली आहे.
प्रशासन एकीकडे वेतनासाठी रक्कम नसल्याचे सांगते व दुसरीकडे कर्मचाºयांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करते़ हा दुजाभाव असल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. जर वेतनासाठी पैसे नसतील तर स्वेच्छानिवृत्ती घेणाºया कर्मचाºयांना आर्थिक लाभ देण्यासाठी कुठून पैसे येणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.