केवळ अडीचशे लाइनमनवर एमटीएनएलच्या कामाचा ताण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 06:10 AM2020-02-13T06:10:33+5:302020-02-13T06:10:45+5:30

सेवेबाबतच्या तक्रारी वाढल्या; कंत्राटी कर्मचारी भरल्यास कामाचा ताण कमी होण्याची कर्मचाऱ्यांना आशा

MTNL's workload on just 250 linemen | केवळ अडीचशे लाइनमनवर एमटीएनएलच्या कामाचा ताण

केवळ अडीचशे लाइनमनवर एमटीएनएलच्या कामाचा ताण

Next

खलील गिरकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल)मधील बहुसंख्य कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा लाभ घेतल्याने, मुंबईतील एमटीएनएलच्या कामाचा ताण अवघ्या अडीचशे लाइनमनवर आला आहे. त्यामुळे एमटीएनएलच्या सेवेबाबतच्या तक्रारींमध्ये भर पडली असून, तक्रारींची दखल घेणेही अडचणीचे ठरत आहे. कंत्राटी कर्मचाºयांची भरती केल्यावर ही परिस्थिती सुधारेल, अशी आशा आताच्या कर्मचाºयांना आहे.
एमटीएनएलच्या मुंबईतील १० हजार १६८ कर्मचाºयांपैकी स्वेच्छानिवृत्तीनंतर १,८८९ कर्मचारी उरले आहेत. त्यापैकी काहींवर कारवाई, काहींची चौकशी सुरू असल्याने प्रत्यक्षात मुंबईत १,७९९ कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत. एमटीएनएल सेवा सुुरळीत करण्यासाठी ग्राउंड लेव्हलवर लाइनमन असतात. स्वेच्छानिवृत्तीपूर्वी टेलिकॉम असिस्टंट (लाइनमन) ही संख्या ३,०६८ होती, ती आता २५८ वर आली असून टेलिकॉम टेक्निकल असिस्टंटची संख्या २१० वरून ४१वर आली. त्यामुळे एमटीएनएलच्या कामात व्यत्यय निर्माण झाला आहे.
प्रशासनाने कर्मचाºयांच्या कमी संख्येमुळे मुंबईतील १ हजार लाइनमन व ५०० सहायक लाइनमन नियुक्त करण्याची निविदा काढली. ही भरती ६ महिन्यांच्या मुदतीसाठी कंत्राटी तत्त्वावर होईल. त्यानंतर, परिस्थितीत सुधारेल, अशी आशा कर्मचाºयांना आहे.
पायधुनी, मांडवीत एमटीएनएल लँडलाइन, वाय-फायचे ग्राहक अस्लम मलकानी यांची सेवा गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यांनी याबाबत एमटीएनएलकडे तक्रार केली. टिष्ट्वटरवरून दाद मागितली. तक्रारीकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ नाही, असा आरोप मलकानी यांनी केला. विविध सरकारी कार्यालये व बँकांमध्ये एमटीएनएलचे इंटरनेट वापरले जाते. कर्मचारी कमतरतेमुळे त्याबाबतच्या तक्रारींकडे लक्ष दिले जात नसल्याने ग्राहकांमध्ये असंतोष आहे.

प्रत्येक विभागातील कर्मचाºयांची संख्या घटली
प्रशासकीय सोयीसाठी मुंबईत एमटीएनएलचे पाच विभाग (झोन) आहेत. झोन एकमध्ये नरिमन पॉइंट, मलबार हिल, गावदेवीचा समावेश होतो. तिथे पूर्वी ५१० लाइनमन होते. आता ६१ आहेत. झोन २ मध्ये माझगाव, वरळी, परळ, दादर, प्रभादेवी, पवई, घाटकोपर यांचा समावेश होतो. तिथे पूर्वी ७७१ जण होते. आता केवळ ५७ जण आहेत.
झोन ३ मध्ये माहिम, बीकेसी, मरोळ, अंधेरी, विमानतळ, जोगेश्वरीचा समावेश होतो. तिथे पूर्वी ७६८ जण होते, आता ५३ आहेत. झोन ४ मध्ये कांदिवली, बोरीवली, दहिसर, भार्इंदर येते. तिथे पूर्वी ४७५ तर आता ३७ जण आहेत. झोन पाचमध्ये भांडुप, मुलुंड, ठाणे, घोडबंदर, मुंब्रा, कळवा, दिवा, नवी मुंबई, पनवेल येते. तिथे पूर्वी ५४४ जण होते, आता फक्त ५० कार्यरत आहेत.

Web Title: MTNL's workload on just 250 linemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.