डाएट फराळाला मुंबईकरांची पसंती!, फिटनेस राखण्यासाठी पर्याय, किंमत अधिक असूनही मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 04:33 AM2017-10-20T04:33:59+5:302017-10-20T04:34:24+5:30

गेल्या काही वर्षांपासून डाएट आणि आॅइल फ्री फराळाची मागणी प्रचंड वाढली आहे. फिटनेस राखण्यासाठी पारंपरिक फराळाकडे पाठ फिरवत, अनेक जण डाएट फराळाला मोठ्या प्रमाणावर पसंती देत असल्याचे चित्र आहे.

 Much of the likes of Diet Phraalu, the choice to maintain fitness, the price has increased, despite the demand | डाएट फराळाला मुंबईकरांची पसंती!, फिटनेस राखण्यासाठी पर्याय, किंमत अधिक असूनही मागणी वाढली

डाएट फराळाला मुंबईकरांची पसंती!, फिटनेस राखण्यासाठी पर्याय, किंमत अधिक असूनही मागणी वाढली

Next

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून डाएट आणि आॅइल फ्री फराळाची मागणी प्रचंड वाढली आहे. फिटनेस राखण्यासाठी पारंपरिक फराळाकडे पाठ फिरवत, अनेक जण डाएट फराळाला मोठ्या प्रमाणावर पसंती देत असल्याचे चित्र आहे. हा फराळ साध्या फराळापेक्षा २५ टक्के महाग आहे. तरीही, अत्यंत रुचकर आणि फिटनेस राखण्यासाठी उपयुक्त ठरत असणा-या या फराळाला मोठी मागणी आहे.
दिवाळी ही गोडधोड, फराळाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही; परंतु अति गोडधोड, तेलकट, तूपकट फराळ म्हणजे आजार, जाडेपणाला आमंत्रण! त्यामुळेच आपल्या सुडौल बांध्याबाबत जागरूक असलेली बहुसंख्य तरुणाई दिवाळीत फराळाकडे पाठ फिरवते.
मधुमेही, तसेच अन्य
आजार असणारेही फराळ खाणे टाळतात. या सर्वांना नजरेसमोर ठेवूनच डाएट फराळाची संकल्पना पुढे आली. सुरुवातीला आधी आॅर्डर घेऊनच डाएट फराळ तयार केला जात असे. गेल्या काही वर्षांत मात्र, या फराळाला मागणी वाढली आहे. यातही बेक केलेली करंजी, तेल नसलेला चिवडा, तसेच शुगरफ्री मिठाईला जास्त मागणी असल्याचे फराळविक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळेच आता महिला बचतगटही डाएट फराळ तयार करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत.
असा बनतो डाएट फराळ
डाएट फराळातील पदार्थ तळण्याऐवजी बेक केलेले असतात. पदार्थ बनवताना तुपाऐवजी तेल वापरले जाते. तर मिठाई व गोड पदार्थांमध्ये साखर न घालता शुगर फ्री घातले जाते.

फिटनेससाठी उपयुक्त
तेल, तुपात बनविलेल्या फराळामुळे प्रकृतीच्या कुरबुरी जाणवतात. याउलट बेक्ड, डाएट, आॅइल फ्री फराळ तुमची तब्येत सांभाळणारा शिवाय फिटनेसच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत उपयुक्त आहे. विशेष म्हणजे, हा डाएट फराळ चवीला पारंपरिक फराळासारखाच असतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून साजूक तुपातील लाडू व अन्य फराळ आवडणाºया खवय्यांनी आपला मोर्चा डाएट फराळाकडे वळविल्याने आहारतज्ज्ञ डॉ. निर्मयी गोविल यांनी सांगितले.

Web Title:  Much of the likes of Diet Phraalu, the choice to maintain fitness, the price has increased, despite the demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.