Join us

बहुचर्चित कोपर उड्डाणपूलाचे मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 7:31 PM

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अन्य विकासकामांचेही ऑनलाईन लोकार्पण

डोंबिवली: गेले दोन वर्षे पुर्नबांधणीनिमित्त बंद असलेल्या कोपर उड्डाणपूलाचे काम पुर्ण झाल्याने मंगळवारी दुपारी 1 वाजता या पूलाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वतीने ऑनलाईन लोकार्पण होणार आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, केडीएमसी आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा पूलवाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याने वाहतूककोंडीच्या जाचातून डोंबिवलीकरांची सुटका होणार आहे. गणेशोत्सव सुरू होण्यापुर्वीच हा पूल सुरू होत असल्याने हुश्श; अखेर गणपती पावला अशी भावना वाहनचालक आणि नागरीकांकडून व्यक्त होत आहे.

डोंबिवली शहर पूर्व-पश्चिम जोडणारा आणि कमकूवत झालेला कोपर उड्डाणपूल सप्टेंबर 2019 मध्ये तातडीने वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. तो पूल पाडून त्याठिकाणी नवीन पूल बांधण्याचे काम सुरू होते. त्यामुळे गेले दोन वर्षापासून ठाकूर्ली पुलावरून वाहनांना पूर्व-पश्चिम मार्गस्थ व्हावे लागत आहे. ठाकुर्ली उड्डाणपुलावर वाहनांचा वाढलेला ताण पाहता वाहनचालकांना कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे कोपर उड्डाणपूल कधी सुरू होईल अशी प्रतिक्षा सर्वानाच लागून राहीली होती. कोपर पूलाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात होते. डांबरीकरण आणि रंगरंगोटीचे काम बाकी होते. परंतू ते काम मार्गी लागल्याने पूल वाहतूकीसाठी खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.केडीएमसीच्या अखत्यारीतील हा उड्डाणपूल सुरूवातीला साडेसात मीटर रूंद होता. दरम्यान पुर्नबांधणी करताना मात्र तो 10 मीटर रुंद करण्यात आला आहे. रेल्वेच्या हद्दीतील पुलाची रुंदी मात्र बदलण्यात आलेली नाही. जूना पूल वेडीवाकडी वळणांचा होता. परंतू नवीन पूलाची रचना बदलण्यात आली आहे. भविष्यात पुलाच्या बाजूला दुचाकी आणि तीनचाकी वाहने जाण्यासाठी स्लिप रोड बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी विशिष्ट जागा सोडण्यात आली आहे.अन्य विकासकामांचेही लोकार्पणसावित्रीबाई फुले कलामंदिरात हा कोपर उड्डाणपूलाचा ऑनलाईन उदघाटनाचा सोहळा पार पडणार आहे. यावेळी तेजस्विी बस, शहर दर्शन बससेवा, आय वॉर्ड व महाराष्ट्र नगर येथील नागरी आरोग्य केंद्र, प्राणवायु प्रकल्प, शास्त्रीनगर आणि रूक्मिणीबाई रूग्णालयातील अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह, मांडा टिटवाळा येथील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अग्निशमन  केंद्र, जैव विविधता उद्यान आदिंचेही ऑनलाईन लोकार्पण होणार आहे.

टॅग्स :डोंबिवलीउद्धव ठाकरेएकनाथ शिंदे