Join us  

मुग्धा चिटणीस स्मृती कथाकथन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:05 AM

मुंबई : ग्रंथालीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मुग्धा चिटणीस स्मृती कथाकथन स्पर्धा आयोजित केली आहे. ग्रंथालीच्या ग्रंथप्रसारयात्रेत, १९८२ साली, मुग्धा सहभागी ...

मुंबई : ग्रंथालीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मुग्धा चिटणीस स्मृती कथाकथन स्पर्धा आयोजित केली आहे. ग्रंथालीच्या ग्रंथप्रसारयात्रेत, १९८२ साली, मुग्धा सहभागी झाल्या होत्या. ग्रंथाली त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंत्रमुग्धा हे डॉ. शुभा आणि अशोक चिटणीस लिखित चरित्र, १० एप्रिल रोजी प्रकाशित करणार आहे. कथाकथन स्पर्धा ग्रंथाली, मुग्धा चिटणीस-घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठान, व्हिजन व्हाईस एन अ‍ॅक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. स्पर्धेमध्ये महत्त्व वाचिक अभिनयाला दिले जाणार आहे. स्पर्धेमध्ये १० ते १५ मिनिटांचेच कथावाचन सादर करता येईल. स्पर्धेसाठी केवळ मराठी कथासंहिता ग्राह्य धरली जाईल. यावेळी होणारी ही स्पर्धा ऑनलाईन स्वरूपाची आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कथावाचनाचा १० ते १५ मिनिटांचा व्हिडिओ चित्रीत करून त्याची ड्राईव्ह लिंक पाठवायची आहे.