Join us

मुंबईत 'मुका घ्या मुका' सिनेमा सुरूय; कारवाईनंतर संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 10:14 AM

मी तो व्हिडिओ पाहिला नाही, पण मला कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. आमच्या घरात पोलीस येत आहेत

मुंबई - शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि महिला नेत्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवरुन आता राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे या व्हिडिओप्रकरणावरुन पोलिसांनी कारवाई सुरू केली असून दहिसर पोलिसांनी एका तरुणाला अटकही केली. त्यानंतर, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अटकेतील मुलाच्या घरी जाऊन त्याच्या आईचे अश्रू पुसले. तसेच, याप्रकरणी अनेक सवाल उपस्थित करत आमदार प्रकाश सुर्वे गप्प का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. त्यानंतर, आता खासदार संजय राऊत यांनीही शिवसेना कार्यकर्त्यांवर होत असलेल्या कारवाईवरुन शिंदे गटावर निशाणा साधलाय.  

मी तो व्हिडिओ पाहिला नाही, पण मला कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. आमच्या घरात पोलीस येत आहेत. हा काय प्रकार सुरूय. मुळात हा व्हिडिओ त्या आमदाराच्या मुलानं शेअर केलाय. त्याला अटक केली का? मग कोणाची बदनामी करताय असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारला प्रश्न केलाय. ज्या काही समजतयं, त्याअर्थी पहिले गुन्हेगार ते आहेत मुके घेणारे, दादा कोंडकेंनी त्यांच्यावर सिनेमाच काढला असता. दादांचा एक सिनेमा होताच, मुका घ्या मुका... आता नव्याने शिंदे गट हा सिनेमा करणार असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत राऊत यांनी व्हिडिओप्रकरणी भाष्य केलं. 

सार्वजनिक ठिकाणी तुम्ही अश्लील वर्तन करत असाल, तर अश्लील वर्तन करणाऱ्यांवर पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुम्ही मुके घेतले तुम्ही निस्तारा, आमच्याकडे बोटे दाखवू नका, आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका, असे म्हणत खासदार राऊत यांनी शिवसेना कार्यकर्त्यांवर होत असलेल्या कारवाईवर भाष्य केलं. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनामुंबईसोशल व्हायरल