उकाड्याने मुंबईकर घामाघूम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 06:46 AM2019-04-06T06:46:18+5:302019-04-06T06:47:26+5:30
आर्द्रता वाढली; कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यापूर्वीच मुंबई शहर आणि उपनगरातील वातावरण तापले आहे; त्यास कारणही तसेच आहे. मुंबईचे कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येत असून, आर्द्रता ९४ टक्क्यांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. परिणामी, वाढते तापमान, वाढती आर्द्रता आणि उकाड्यामुळे मुंबईकर घामाघूम झाले आहेत.
मुंबईसह राज्यभरातील कमाल तापमान वाढत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक शहरांचे कमाल तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सअसच्या घरात पोहोचले आहे. उष्ण वारे घशाला कोरड पाडत असून, दिवसागणिक यात वाढच होत आहे. मुंबई शहर आणि उपनगराचा विचार करता मुंबईचे कमाल तापमान मागील दोन दिवसांपूर्वी ३२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत होते. शुक्रवारी ते ३३ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले. तर आर्द्रता ९४ टक्के नोंदविण्यात येत आहे. वातावरणातील बदलामुळे मुंबईच्या उकाड्यात वाढच होत आहे. दिवसाइतकाच रात्रीचा उकाडाही मुंबईकरांना तापदायक ठरत आहे.
अहमदनगर ४१.४
अकोला ४३.१
अमरावती ४३.६
औरंगाबाद ४१
बुलडाणा ३९.५
चंद्रपूर ४१.८
जळगाव ४२.८
मालेगाव ४१.६
मुंबई ३३.0
नागपूर ४२.६
नांदेड ४०.५
उस्मानाबाद ३८.६
सातारा ३८.३
सोलापूर ३८.४
वर्धा ४३.0
यवतमाळ ४१.५
(शुक्रवारचे कमाल तापमान 0उ )