अनंत-राधिकासह लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले मुकेश अंबानी, सून श्लोकाही दिसली सोबत -  बघा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 01:23 AM2024-09-14T01:23:25+5:302024-09-14T01:25:04+5:30

गेल्या गुरुवारी अनंत अंबानीने लालबागच्या राजाला एक सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. हा मुकुट तयार करण्यासाठी 20 किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. याची किंमत सुमारे 15 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे.

Mukesh Ambani along with Anant-Radhika arrived to have darshan of Lalbaghcha raja, daughter-in-law Shloka was also seen Watch the Video | अनंत-राधिकासह लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले मुकेश अंबानी, सून श्लोकाही दिसली सोबत -  बघा Video

अनंत-राधिकासह लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले मुकेश अंबानी, सून श्लोकाही दिसली सोबत -  बघा Video


रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी मुलगा अनंत अंबानी तथा सुना राधिका मर्चंट आणि श्लोका मेहता यांच्यासोबत लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाटी पोहोचले होते. यावेळी त्यांनी गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेतले. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तत्पूर्वी, गेल्या गुरुवारी अनंत अंबानीने लालबागच्या राजाला एक सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. हा मुकुट तयार करण्यासाठी 20 किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. याची किंमत सुमारे 15 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय रिलायन्स फाउंडेशनने लालबागचा राजा मंडळाल 24 डायलिसिस मशीनही दिल्या आहेत.

यावेळी मुकेश अंबानी नेहमी प्रमाणेच सिंपल अंदाजात दिसून आले. त्यांनी फुल स्लीव्स सिल्कचा गोल्डन कुर्ता आणि वाइट पायजमा आणि त्यावर जॅकेट परिधान केले होते. तर अनंत अंबानीही साध्या वेशातच दिसून आला. त्याने निळ्या रंगाचा शर्ट तर ब्लॅक कलरची पँट परिधान केली होती.

Web Title: Mukesh Ambani along with Anant-Radhika arrived to have darshan of Lalbaghcha raja, daughter-in-law Shloka was also seen Watch the Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.