होणाऱ्या जावयाच्या घरी आधी रोमान्स करायचे नीता व मुकेश अंबानी, स्वाती पिरामल यांनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2018 11:56 AM2018-05-08T11:56:07+5:302018-05-08T11:56:07+5:30

स्वाती पिरामल यांनी मुकेश व नीता अंबानी यांच्याबद्दलचा मजेशीर किस्सा सांगितला.

mukesh ambani-neeta ambani love story start at piramal house decades ago | होणाऱ्या जावयाच्या घरी आधी रोमान्स करायचे नीता व मुकेश अंबानी, स्वाती पिरामल यांनी सांगितला किस्सा

होणाऱ्या जावयाच्या घरी आधी रोमान्स करायचे नीता व मुकेश अंबानी, स्वाती पिरामल यांनी सांगितला किस्सा

Next

मुंबई- मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी व आनंद पिरामल लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. नुकताच दोघांचा साखरपुडा पार पडला. जुन्या सिनेमांमध्ये ज्या प्रमाणे दाखविलं जायचं अगदी त्याच प्रमाणे देशातील दोन मोठे उद्योगपती एकमेकांशी नातं जोडत आहेत. ईशा व आनंद यांच्या नात्यामुळे अंबानी व पिरामल यांच्यातील अनेक दशकांची मैत्री नात्यात बदलते आहे. एक वेळ अशी होती की त्यावेळी मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा रोमान्स पिरामल यांच्या घरी चालायचा. एका कार्यक्रमात आनंद पिरामल यांची आई स्वाती पिरामल यांनी मुकेश व नीता अंबानी यांच्याबद्दलचा मजेशीर किस्सा सांगितला.मुकेश अंबानी, नीता अंबानी यांनी भेटण्यासाठी दोन-तीन तास गाडी चालवत यायचे, असं स्वाती पिरामल यांनी सांगितलं.

त्याकाळी मुकेश अंबानी यांच्याकडे एक हिरव्या रंगाची गाडी होती. नीता अंबानी यांना भेटण्यासाठी ते तीन तास ड्राइव्ह करून पाताळगंगा ते मुंबई यायचे. अनेक वर्षांपूर्वी पाताळगंगामध्ये अंबानी कुटुंबीयांचा एक प्रोजेक्ट होता. त्याची संपूर्ण जबाबदारी मुकेश अंबानी यांच्याकडे होती. त्यावेळी मुकेश अंबानी व नीता अंबानी पिरामल हाऊसमध्ये भेटायचे. मुकेश व नीता अंबानी यांच्या भेटीनंतर स्वाती व अजय पिरामल नीता अंबानी यांना मुकेश अंबानीबद्दल अनेक मजेशीर प्रश्न विचारयाचे. ते दिवस खूप मजेशीर होते, असं स्वाती पिरामल यांनी म्हटलं. 

या सर्व सुखद क्षणानंतर अंबानी व पिरामल कुटुंबीय मैत्रीचं रुपांतर नात्यात करत आहेत. आनंद पिरामल यांनी ईशाला महाबळेश्वरमधील एका मंदिरात प्रपोज केलं होतं. डिसेंबर महिन्यात हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. 

Web Title: mukesh ambani-neeta ambani love story start at piramal house decades ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.