Sachin Vaze: स्कॉर्पिओ, जॅग्वार, नंबर प्लेट अन् मुकेश अंबानी; सचिन वाझेंचा पाय आणखी खोलात?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 02:02 PM2021-03-15T14:02:55+5:302021-03-15T14:03:38+5:30
Sachin Vaze: पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या अडचणी वाढल्या; एनआयएच्या अटकेनंतर सेवेतून निलंबित
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (sachin Vaze) यांना विशेष न्यायालयाने २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. एनआयएच्या या कारवाईनंतर सचिन वाझेंना पोलीस सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे. याशिवाय एनआयच्या तपासातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीमुळे सचिन वाझेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
NIA सचिन वाझेंना पीपीई किट घालून चालायला लावणार; प्रकरणाचं गूढ लवकरच उलगडणार?
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारीला एक स्कॉर्पिओ कार स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत आढळली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. शनिवारी रात्री सचिन वाझेंना एनआयएनं अटक केली. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासातून महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. स्फोटकांनी आढळलेल्या स्कॉर्पिओची नंबर प्लेट बदलण्यात आली होती. नव्या नंबर प्लेटवरील क्रमांक एका जॅग्वारचा आहे आणि ती जॅग्वार दुसऱ्या तिसऱ्या कोणाची मालकीची नसून मुकेश अंबानींच्याच मालकीची आहे.
पोलीस मुख्यालय, मुलुंड टोलनाका अन् बदललेल्या नंबर प्लेट्स; वाझेंच्या अटकेमागचं कारण समोर
स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओच्या नंबर प्लेटवरील क्रमांक आणि मुकेश अंबानींच्या नंबर प्लेटवरील क्रमांक सारखाच आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिल्याचं वृत्त झी हिंदुस्ताननं दिलं आहे. मुकेश अंबानींच्या सुरक्षेचा ताफा मोठा आहे. यामध्ये असलेल्या एका जॅग्वारचा क्रमांक आणि स्कॉर्पिओचा क्रमांक सारखाच आहे. एका अज्ञात व्यक्तीनं अंबानींच्या घराबाहेर स्कॉर्पिओ सोडली. या व्यक्तीनं पीपीई किट घातला होता. ही व्यक्ती सचिन वाझेच होती का, याचा शोध एनआयए घेत आहे.
सचिन वाझेंनी चौकशीत घेतलं बड्या अधिकाऱ्याचं नाव; दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळखही पटली
स्कॉर्पिओ, वझे, अलिबाग आणि अर्णब गोस्वामी
२५ फेब्रुवारीला अंबानींच्या घराबाहेर एक स्कॉर्पिओ स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत सापडली. हीच स्कॉर्पिओ घेऊन वाझे नोव्हेंबर २०२० मध्ये अलिबागला गेले होते. त्यावेळी रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली होती. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गोस्वामींना अटक केली गेली होती. गोस्वामींना अटक करणाऱ्या पोलीस पथकाचं नेतृत्त्व वाझेंनी केलं होतं.