लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यात फसवणूक केल्यानंतर २०१९ मध्ये ताे दुबईला पसार झाला. त्याचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश असतानाही तो पसार होण्यात यशस्वी झाला होता. गायतोंडे यांनी तेथील पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. मुकेशबाबतचा व्हिडिओही दुबईत व्हायरल केल्यामुळे तेथील फसवणूक थांबली.
गायतोंडे यांनी फसवणूक झाल्यानंतर २०१९ मध्ये मुंबई पोलीस दलातील एका सहआयुक्तांची भेट घेतली. मात्र, त्यांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी सध्या एटीएसमध्ये कार्यरत एका अधिकाऱ्याला भेटा, तो मदत करेल असे सांगितले. त्या अधिकाऱ्याने असेच २५ दिवस घालवले. पुढे त्यांनी खार पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तेव्हाही तपास अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्यामुळे मुकेश पसार होण्यास यशस्वी झाला, असा आरोप गायताेंडे यांनी केला. मात्र तीन वर्षांनंतर मुकेश भारतात परत येणार असल्याचे समजताच महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या सहकार्यामुळे ताे पाेलिसांच्या जाळ्यात अडकल्याचेही त्यांनी नमूद केले.
* हजारो लोकांची फसवणूक केल्याचा संशय
मुकेशने गुजरातमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक केल्याची माहितीही समोर येत आहे. दरम्यान, त्याने आतापर्यंत हजारो लोकांची फसवणूक केल्याची शक्यताही गायतोंडे यांनी वर्तवली.