मुंबई : शीना बोरा हत्याकांडप्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी इंद्राणी मुखर्जी हिचा पती पीटर मुखर्जी आणि त्याचा पुत्र राहुल मुखर्जी यांच्याकडे कसून चौकशी केली. शीनाच्या हत्येपूर्वी तिच्याशी झालेले संभाषण आणि हत्येच्या अनुषंगाने या पिता-पुत्रांकडे स्वतंत्रपणे विचारणा करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार त्यांच्याकडे आणखी विचारणा केली जाईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.सीबीआयच्या मुंबई शाखेच्या पथकाने मुंबई पोलिसांकडून सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. तिघा आरोपींकडे चौकशी करण्याबरोबर यासंबंधी अन्य व्यक्तींचेही जबाब नोंदविले जात आहेत. त्यानुसार सोमवारी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी इंद्राणीचा तिसरा पती पीटर मुखर्जी व त्याचा मुलगा राहुल याला चौकशीसाठी पाचारण केले होते. त्यांना स्वतंत्रपणे प्रश्नावली देऊन हत्येच्या अनुषंगाने विचारणा केली. (प्रतिनिधी)
मुखर्जी पिता-पुत्राकडे सीबीआयची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2015 3:07 AM