Join us  

मोठी बातमी! PM Kisan योजनेच्या धर्तीवर राज्यात 'मुख्यमंत्री किसान योजना' आणणार, शिंदेंचा 'मास्टरस्ट्रोक'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 3:34 PM

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi yojana) धर्तीवर आता राज्यातही 'मुख्यमंत्री किसान योजना' लागू करण्याचा निर्णय

मुंबई-

राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi yojana) धर्तीवर आता राज्यातही 'मुख्यमंत्री किसान योजना' लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. कृषी विभागासोबतच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. त्याच धर्तीवर राज्यात देखील मुख्यमंत्री किसान सम्मान निधी योजना राबवण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक महिन्यात टप्प्या टप्प्यानं शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे. प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. 

कृषी विभागाच्या बैठकीत याबाबचा निर्णय झालेला असला तरी अर्थसंकल्पात योजनासाठी नेमकी किती रुपयांची तरतूद केली जाणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण सरकार लवकरच याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. तसंच या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरतील याचे निकषही अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र, मागील तीन दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. 

टॅग्स :शेतकरीएकनाथ शिंदे