मुकुंदचा १०० तासांचा विक्रम हुकला

By admin | Published: January 9, 2017 04:03 AM2017-01-09T04:03:28+5:302017-01-09T04:03:28+5:30

अदिवासी भागात वाचनालय उभारण्यासाठी १०० तास फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या मुकुंद गावडेची झुंज अखेर अपयशी ठरली.

Mukund's record of 100 hours halted | मुकुंदचा १०० तासांचा विक्रम हुकला

मुकुंदचा १०० तासांचा विक्रम हुकला

Next

मुंबई : अदिवासी भागात वाचनालय उभारण्यासाठी १०० तास फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या मुकुंद गावडेची झुंज अखेर अपयशी ठरली. प्रकृती बिघडल्याने आयोजकांच्या सांगण्यानुसार मुकुंदला थांबावे लागले. शनिवारी रात्री बाराच्या सुमारास मुकुंदने फलंदाजी थांबवली तेव्हा ७२ तास २१ मिनिटे आणि २९ सेंकद इतकी वेळ नोंदवण्यात आली.
समन्वय प्रतिष्ठान व कीर्ती संजीवनी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या विक्रमी फलंदाजीचे आयोजन झाले होते. या विक्रमाच्या माध्यमातून सफाळे अदिवासी पाड्यात शैक्षणिक उपक्रमासाठी निधी उभारण्यात येणार होता. शिवाजी पार्क येथे बुधवारी ६ वाजता मुकूंदने फलंदाजीस प्रारंभ केल्यानंतर शनिवारी संध्याकाळी केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्यावेळी डॉक्टरांनी मुकुंदला अशक्तपणा व डोळयांवर झापड येत असल्याचे सांगितले. मात्र त्याने पुन्हा खेळण्यास सुरुवात केली. रात्री बाराच्या सुमारास मुकुंदला थकवा जाणवला. शिवाय बॉलही कमी प्रमाणात दिसत होता. (प्रतिनिधी)
७२ तासांची प्रतीक्षा... मुकुंदने खेळ थांबवला त्यावेळी ७२ तासांहून अधिक वेळेची नोंद झाली होती. या खेळाची ध्वनीचित्रफित गिनीज बुक आॅफ रेकॉर्डकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर पडताळणी करुन अधिकृतरित्या विक्रमाची नोंद होईल. त्यामुळे मुकुंदच्या विक्रमाच्या आशा कायम आहेत. याआधीचा सर्वाधिक ५० तास फलंदाजी करण्याचा विक्रम पुण्याच्या विराग मारेच्या नावावर आहे.
खेळण्याची इच्छा होती पण...
मुकुंदने विचार करुनच १०० तास फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुळात ७२ तास खेळल्यानंतर थकवा येणे साहजिकच आहे. मी कामावर असल्याने शनिवारी संध्याकाळी नक्की काय घडले? हे सांगू शकत नाही. मात्र मला मिळालेल्या माहितीनुसार त्याला खेळण्याची इच्छा होती. परंतु आयोजकांच्या सुचनेनुसार त्याने फलंदाजी थांबवली.
-प्रियांका गावडे,
मुकुंदची आई

सावरकर स्मारकाचे सहकार्य
च्स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने मुकुंद गावडेला अनोखे सहकार्य केले आहे. पालघरस्थित ‘समन्वय’ या संस्थेच्या पेणंद येथील आदिवासी पाड्यातील १०० विद्यार्थ्यांसाठी सुरू होत असलेल्या वाचनालयासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची संपूर्ण ग्रंथसंपदा दिली जाणार आहे.
च्यातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी, हा हेतू आहे. माझी जन्मठेप, सहा सोनेरी पाने, १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध, हिंदुत्व, हिंदुपदपतशाही, हिंदुराष्ट्रदर्शन, शत्रूच्या शिबीरात, अंदमानच्या अंधेरीतून, हुतात्म्यांनो, आत्महत्या आणि आत्मार्पण, गांधी गोंधळ, ऐतिहासिक निबंध, ऐतिहासिक निवेदने, विज्ञाननिष्ठ निबंध, गरमा गरम चिवडा, माज्या आठवणी अशा विविध प्रकारची विपुल ग्रंथसंपदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिली असून त्याचा आनंद मुकुंद गावडेच्या कामगिरीने आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना मिळेल.

Web Title: Mukund's record of 100 hours halted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.