मल्टी-मॉडेल इंटीग्रेशनमुळे भुयारी मेट्रो प्रवास सोपा; वाहतूक पोलिस, बेस्ट, पालिका, विमानतळ प्राधिकरण सरसावले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 02:02 PM2024-10-14T14:02:45+5:302024-10-14T14:04:07+5:30
यात मरोळ नाका स्थानकांच्या कॉन्कोर्सपर्यंत सर्वात नजीकच्या प्रवेश तसेच निकास स्थानास जिन्यांद्वारे जोडले आहे.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो ३ या ॲक्वा लाइनवरील प्रवास सुलभ व्हावा, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे सर्व भागधारक आणि सेवा प्रदात्यांच्या समन्वयाने मल्टी-मॉडेल इंटीग्रेशनसाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. त्यानुसार स्थानकात ये-जा करणाऱ्यांच्या सोयीसाठी वाहतूक पोलिस, बेस्ट, महापालिका आणि विमानतळ यांच्या समन्वयाने विविध कामे हाती घेतली आहेत.
यात मरोळ नाका स्थानकांच्या कॉन्कोर्सपर्यंत सर्वात नजीकच्या प्रवेश तसेच निकास स्थानास जिन्यांद्वारे जोडले आहे. वातानुकूलित भूमिगत पादचारी क्रॉसिंग मुख्य रस्त्याच्या खाली स्टेशनसह जोडले गेले आहे; यात एमआयडीसी सेंट्रल रोड, वेव्ह आणि बीकेसी रोडचा समावेश आहे. विमानतळ प्रवाशांसाठी टी १ आणि टी २ स्थानकांवर छत टाकले आहे.
फूटपाथ आणि इतर कामांना पावसामुळे थोडा विलंब झाला. लिफ्ट आणि एस्केलेटरने सुसज्ज असलेल्या सर्व १० मेट्रो स्थानकांचे प्रवेश, निर्गमन तयार होत आहेत. मल्टी-मॉडल इंटिग्रेशनच्या कामांच्या पूर्ततेमुळे प्रवाशांना येत्या काही आठवड्यांमध्ये सुखद प्रवासाचा अनुभव घेता येईल. मेट्रो स्थानके व इतर वाहतूक सुविधांदरम्यान सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाच्या सोई उपलब्ध करून देण्यावर भर आहे. प्रवाशांना फायदा होईल.
- अश्विनी भिडे, एमडी, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन