प्राची सोनावणे, नवी मुंबईमहानगरपालिकेच्या वतीने ११ वर्षांपूर्वी सीबीडी सेक्टर ८ परिसरात बालसंगोपन केंद्र, व्यायामशाळा, वाचनालय असे विविध उपक्रम राबविणारी सुसज्ज इमारत बांधण्यात आली होती. मदर तेरेसा बहुद्देशीय सुविधा केंद्राच्या याच इमारतीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. इमारतीच्या आवारात तसेच आतील भागातील सर्वच वस्तू धूळखात पडल्या असून, बहुतांशी या इमारतीचे टाळे बंदच असतात.१९ आॅगस्ट २००४ साली याच इमारतीचा मोठ्या थाटामाटात शुभारंभ करण्यात आला होता. मात्र आजच्या घडीची तरी अवस्था पाहिली तर त्यानंतर कोणी याकडे ढुंकूणही पाहिले नाही असे स्पष्ट होते. सुरुवातीला कराटे, तायक्वांदो या खेळांचे मुलांना प्रशिक्षण दिले जात होते. पण आता मात्र या इमारतीला बहुतांशी टाळा बंद केलेलेच पहायला मिळते. इथल्या नागरिकांशी याविषयी चर्चा केल्यावर असे लक्षात आले की गेली कित्येक वर्षे पालिकेच्या वतीने उपक्रम राबविले जात नाहीत. इमारतीचे मुख्य प्रवेशव्दार उघडे ठेवल्याने याठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. याच परिसरातील लहान मुले इमारतीच्या आवारात खेळतात. या बहुद्देशीय सुविधा केंद्राचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना प्रशासनाच्या उपक्रमाचा लाभ घेता येणार, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते, मात्र काही दिवसातच या प्रकल्पाने घोर निराशा केली. वाचनालय, व्यायामशाळा यांच्या अंतर्गत आजपर्यंत कोणतेही उपक्रम राबविले जात नसल्याचे इथल्या रहिवाशांनी सांगितले. येता-जाता नजरेस पडणाऱ्या या इमारतीकडे प्रशासनाने मात्र दुर्लक्ष केले आहे. यादरम्यान योजना विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबूकस्वार यांच्याशी संपर्क साधला असता हे केंद्र सुरू आहे.
बहुद्देशीय सुविधा केंद्र धूळखात पडून
By admin | Published: May 25, 2015 2:27 AM