मुंबई- आज नोकरी, घर, इतर कार्यक्रम हे सगळं सांभाळत असताना तुम्ही तुमच्या अंगातील कलाही जोपासता आहात, हे कसं काय मॅनेज करता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रातील प्रत्येक महिला मग ती नोकरी करणारी असो किंवा कुटुंब सांभाळणारी असो, ती अशा प्रकारचे मल्टी टास्किंग करते. यावेळी अमृता यांनी ‘आज जाने की जिद ना करो...’ या बहारदार गीताचे कडवे सादर केले.> मी प्रत्येक दिवशी संगीताचा विद्यार्थी या नात्याने साधना करते. प्रत्येक दिवशी मी काही ना काही शिकत आलेय. अजून खूप काही शिकायचं आहे, ही तर फक्त एक सुरुवात आहे.- श्रेया घोषाल, ‘देवा एक अंतरंगी’मधील गाण्यासाठी> गेली अनेक वर्ष करत असलेले काम लोकापर्यंत पोहोचतेय आणि त्याची पोचपावती अशा पुरस्काराच्या स्वरुपात मिळते याचा आनंद आहे. पानी फाऊंडेशनच्या प्रयत्नांचे कौतुक वाटते, अशा कृतींतूनच आदर्श घेतला पाहिजे.- सोनाली कुलकर्णी,अभिनय, गुलाबजाम>दिग्गज व्यक्तींसमोर हा सन्मान मला मिळणे ही खूप अभिमानास्पद आहे. ‘लोकमत महाराष्ट्रीयन’ या शीर्षकाने माझा गौरव झाला याविषयीसुद्धा विशेष आनंद आहे. ज्युरींनी केलेली माझी निवड व मत देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानते.ऋतुजा बागवे, अभिनय, अनन्या> हा सन्मान शाहू नगरीचा आहे, जनतेचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. समाजातील दु:ख काय आहे, हे जाणून मी जीवरक्षकाचे काम करीत आहे. हा माझा एकट्याचा सन्मान नसून संपूर्ण कोल्हापूरचा आहे.- दिनकर कांबळेजीवरक्षक, कोल्हापूर>३२ वर्ष महाराष्ट्रात आणि देशात समाजासाठी कार्य करतोय. येत्या पाच वर्षांत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा मानस आहे, या प्रयत्नांना उर्जा देणारा हा पुरस्कार आहे. या पुरस्कारामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे.- शांतिलाल मुथ्थासमाजसेवक, पुणे>‘लोकमत’ आणि माझे जुने ऋणानुबंध आहेत. ‘लोकमत’मध्ये वितरण विभागात मी काल केले होते, त्यामुळे या सन्मानाचे विशेष कौतुक आहे. याप्रसंगी बाबा दळवी यांची आठवण होते. त्यामुळे हा पुरस्कार मी त्यांना अर्पण करतो.-चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शन, ट्रायोलॉजी>हा पुरस्कार मिळाल्याचा अत्यानंद आहे. मात्र आता मनोगत व्यक्त करताना नि:शब्द झालो आहे. आपण इतकी वर्ष काम करत असताना त्याची मिळालेली अशी पोचपावती नवीन काम करण्यासाठी स्फूर्ती देत असते.-सुमित राघवन,अभिनय,आपला मानूस
महाराष्ट्रातील प्रत्येक महिला मल्टी टास्किंग- अमृता फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 4:54 AM