मुलुंड: मुसळधार पावसामुळे २ मुले वाहून गेली, एकाचा मृत्यू
By admin | Published: June 25, 2016 08:06 AM2016-06-25T08:06:25+5:302016-06-25T09:59:06+5:30
पावसात खेळणारी दोन मुले गटारात पडून वाहून गेल्याची घटना मुलुंडमध्ये घडली असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - मुंबईत अखेर मान्सूनचे आगमन झाले असून शुक्रवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले. याच पावसात खेळणारी दोन मुले गटारात पडून वाहून गेल्याची घटना मुलुंडमध्ये घडली असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे तर एक गंभीर जखमी आहे.
- मुलुंडच्या अमरनगर परिसरातील साईसिद्धी हॉस्पिटलसमोर ही दुर्घटना घडली. इरफान सय्यद 15 असे मृत मुलाचे नाव आहे तर अरबाज अन्सारी (12) याच्यावर सायन रुग्नालयातील अतिदक्षता विभागात् उपचार सुरु आहेत. दोन्ही मुले अमरनगर परिसरातील रहिवासी आहेत. रात्रीच्या सुमारास ही दोघेही मुले घरासमोरील छोट्या नाल्यातून वाहून गेली. रात्री उशिराने येथील हायलंड पार्क च्या मोठ्या नाल्यातून त्यांना बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी मुलुंड पोलीस अधिक तपास करत आहेत.
मात्र या घटनेमुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण असून मुलांच्या मृत्यूला पालिका प्रशासनच जबाबादार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान येत्या ४८ तासांत मुंबईत आणखी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.