मुलुंड विधानसभा : आघाडीकडून पाटील, सप्रा तर मनसेतून दळवींचा काढता पाय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 03:55 AM2019-10-03T03:55:37+5:302019-10-03T03:55:54+5:30

मुलुंड विधानसभामधून काँग्रेसचे माजी आमदार चरणसिंग सप्रा आणि मनसेकडून सत्यवान दळवी यांनी निवडणुकीतून काढता पाय घेतला आहे.

Mulund Assembly: Patil, Supra and MLAs can be removed from MNS by alliance | मुलुंड विधानसभा : आघाडीकडून पाटील, सप्रा तर मनसेतून दळवींचा काढता पाय

मुलुंड विधानसभा : आघाडीकडून पाटील, सप्रा तर मनसेतून दळवींचा काढता पाय

Next

मुंबई : मुलुंड विधानसभामधून काँग्रेसचे माजी आमदार चरणसिंग सप्रा आणि मनसेकडून सत्यवान दळवी यांनी निवडणुकीतून काढता पाय घेतला आहे. काँग्रेस आणि मनसेमधून यंदा नवीन चेहरे रिंगणात उभे आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीला सप्रा यांनी काँग्रेसमधून उमेदवारी लढवत, २८ हजार ५४३ मते मिळवून ते दुसऱ्या क्रमांकावर होते. मनसेकडून दळवी हे चौथ्या स्थानावर होते. विद्यमान आमदार सरदार तारासिंग यांनी ६५ हजार मतांची आघाडी घेत विजय मिळवला होता. यंदा त्यांनी आधीपासूनच निवडणूक न लढवण्याचे ठरविले होते. त्यांच्या उमेदवारीबाबत गुप्तताही ठेवण्याचा प्रयत्न केला. तारासिंग यांचा यंदा पत्ता कट झाल्याने त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवावी म्हणून आग्रह धरला. मात्र त्यांचा नकार कायम असल्याने, काँग्रेसने नवीन उमेदवाराला संधी दिली आहे.

तर, दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनसेचे सत्यवान दळवी यांनी या विधानसभामधून दोन वेळा निवडणूक लढवली होती. २००९ मध्ये मनसे लाटेत ते ३७ हजार ७७२ मतांनी दुसºया क्रमांकावर होते. २०१४ च्या निवडणुकीत त्यांना १३ हजार ४३२ मते पडली होती.

यंदा त्यांनीदेखील विधानसभा न लढविण्याचा निर्णय घेतल्याने मुलुंड विभाग अध्यक्ष तसेच त्यांच्या वहिनी सरकार या कार्यक्रमामुळे भाऊजी म्हणून चर्चेत असलेले राजेश चव्हाण यांनी उमेदवारी लढवावी म्हणून पक्षाकडून आग्रह होता. त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी हर्षला चव्हाण यांना रिंगणात उतरविण्यात येत आहे. हर्षला यांनी २०१७ च्या महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराजय झाला होता. बुधवारी अखेर पक्षाकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
 

Web Title: Mulund Assembly: Patil, Supra and MLAs can be removed from MNS by alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.