Join us

‘मुलुंडचे गार्डन ‘जैसे-थे’ ठेवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 5:06 AM

मुलुंडच्या संभाजीराजे मैदानाच्या काँक्रिटीकरणाचे काम ‘जैसे-थे’ ठेवण्याचा निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला बुधवारी दिला. तसेच याबाबत गुरुवारी तपशिलात आदेश देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.

मुंबई : मुलुंडच्या संभाजीराजे मैदानाच्या काँक्रिटीकरणाचे काम ‘जैसे-थे’ ठेवण्याचा निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला बुधवारी दिला. तसेच याबाबत गुरुवारी तपशिलात आदेश देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.संभाजीराजे मैदानाच्या काँक्रिटीकरणाला माजी आमदार शिशिर शिंदे व येथील रहिवाशांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. मार्च २०१७मध्ये महापालिका आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, मोकळ्या मैदानांवर कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी दिली जाणार नाही. असे असताना या मैदानावर काँक्रिटीकरण करण्यास परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्न याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.संभाजीराजे मैदानात स्केटिंग ट्रॅक, व्हॉलीबॉल व फुटबॉल कोर्ट तयार करण्यात येत आहे. त्यापैकी फुटबॉल व जॉगिंग ट्रॅकचे काम पूर्ण झाले आहे व फुटबॉलच्या मैदानाभोवती कुंपण घालण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यावर न्यायालयाने फुटबॉलच्या मैदानाला कुंपण न घालण्याचे निर्देश महापालिकेला दिले. तसेच सध्या संभाजीराजे मैदानाच्या काँक्रिटीकरणाची स्थिती ‘जैसे-थे’ ठेवण्याचे निर्देश महापालिकेला दिले.

टॅग्स :न्यायालयमुंबई