Join us

मुलुंडच्या ज्येष्ठ नागरिक संघाने अनुभवला सूरमयी 'मेघमणी'

By संजय घावरे | Published: May 27, 2024 7:39 PM

मुलुंड येथील विरंगुळा केंद्रामध्ये 'मेघमणी' हा अनोखा कार्यक्रम नुकताच पार पडला.

मुंबई- मुलुंड येथील विरंगुळा केंद्रामध्ये 'मेघमणी' हा अनोखा कार्यक्रम नुकताच पार पडला. या निमित्ताने मुलुंडमधील ज्येष्ठ नागरिक संघ भक्तीगीते, ओव्या, संत चरित्र असा विविधांगी कार्यक्रमांच्या सुरेल मैफिलीचा आनंद लुटला. मेघना साने, हेमंत साने निर्मित 'मेघमणी' या कार्यक्रमाला मुलुंड ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मुरलीधर शुक्ल, कार्यकारी अध्यक्षा श्रीकांती नगरकर आणि उपाध्यक्ष जयश्री विचारे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्या पत्रकार अलका भुजबळ होत्या. 

मेघना साने यांनी संतांची चरित्रे छोट्या-छोट्या गोष्टी रुपात सांगितली. गौतम बुद्ध, संत ज्ञानेश्वर महाराज, कबीर यांपासून विवेकानंद आणि भगिनी निवेदिता यांचे कार्य सांगितल्यावर संतांचे अभंग आणि भक्ती गीते ही सादर होत होती.  गायिका श्रुती पटवर्धनच्या भक्तीगीत गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. रुचिता कांबळीने गायलेल्या 'तोरा मन दर्पण' या गाण्याने श्रोते भारावून गेले. हेमंत साने यांनी खड्या आवाजात 'चल गं सखे चल गं सखे' पंढरीला असा सूर लावल्यावर त्यात 'जय हरी विठ्ठल' म्हणायला श्रोत्रवृंदही सामील झाला. कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात मेघना साने रचित ओव्या गाण्यासाठी रुचिता कांबळी, नीलिमा सबनीस, सुप्रिया महाजन आणि नयन ठेकेदार सहभागी झाल्या. हेमंत साने यांनी प्रत्येक ओवी वेगळ्या रागात बांधली होती आणि सुरेल स्वरांत सर्व गायकांनी त्या गायल्या.

टॅग्स :मुंबईज्येष्ठ नागरिक