कडक सॅल्युट... जिवाची बाजी लावून वाचवला तिरंगा ध्वज; अग्निशमन दलाच्या जवानाची स्तुत्य कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 03:21 PM2021-03-26T15:21:15+5:302021-03-26T15:24:14+5:30

मुंबईतील भांडुप परिसरात असलेल्या कोविड रुग्णालयात लागली होती आग

mumbai 10 dead in fire at mall hospital treating covid 19 patients fire brigade man save indian flag | कडक सॅल्युट... जिवाची बाजी लावून वाचवला तिरंगा ध्वज; अग्निशमन दलाच्या जवानाची स्तुत्य कामगिरी

कडक सॅल्युट... जिवाची बाजी लावून वाचवला तिरंगा ध्वज; अग्निशमन दलाच्या जवानाची स्तुत्य कामगिरी

Next
ठळक मुद्देमुंबईतील भांडुप परिसरात असलेल्या कोविड रुग्णालयात लागली होती आगमुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश

भांडुप परिसरातील सनराईझ रुग्णालयामध्ये (Sunrise hospital) आग लागल्याची घटना घडली होती. भांडुप परिसरात असलेल्या ड्रीम्स मॉलमध्ये हे रुग्णालय आहे. मॉलच्या पहिल्या मजल्याला आग लागली आणि त्याचा धूर सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या सनराईज रुग्णालयापर्यंत पोहोचला. यामध्ये १० रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस आयुक्तांनी याविरोधात गुन्हा दाखल करणार असून संबंधितांवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे.

दरम्यान, या ठिकाणी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना एक अनोखा फोटोही समोर आला आहे. त्या ठिकाणी लागलेल्या आगीच्या ज्वालांमध्ये आपला तिरंगा ध्वजही येणार होता. परंतु अग्निशमन दलाच्या एका जवानानं आपल्या जीवावर खेळून तिरंगा सुरक्षित खाली आणला. 



मॉलमध्ये रुग्णालय असल्याचं पहिल्यांदाच पाहिलं

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मी पहिल्यांदाच एखाद्या मॉलमध्ये रुग्णालय असल्याचं पाहत आहे. या प्रकरणी नक्कीच कडक कारवाई करण्यात येईल.  या रुग्णालयातील कोरोनाग्रस्त रुग्णांना अन्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहितीही महापौर यांनी दिली आहे.

... म्हणून रुग्णांचा मृत्यू : उद्धव ठाकरे

व्हेंटिलेटरवरील रुग्णांना हलविण्यासाठी वेळ लागला. अन्य कोरोना रुग्णांना तातडीने हलविण्यात आले. यामध्ये व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले आहे. दुर्घटना घडल्यानंतर आपण जागे होतो. या प्रकरणाचीही चौकशी होईल. अशा घटना होऊ नयेत म्हणून राज्यात ज्या ज्या ठिकाणी कोविड हॉस्पिटल, जम्बो सेंटरचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. या हॉस्पिटलची परवानगी येत्या ३१ मार्चला संपणार होती, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. 

राज्यात कोरोना संकट वाढत असताना आरोग्य यंत्रणेची, ह़ॉस्पिटलची मोठ्या प्रमाणावर गरज भासत होती. यामुळे कोरोना संकटामध्ये आरोग्य सुविधा वाढविण्याच्या उद्देशाने कोविड हॉस्पिटल म्हणून भांडुपच्या ड्रीम्स मॉ़लमध्ये सनराईज हॉस्पिटलला परवानगी देण्यात आल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला.

Web Title: mumbai 10 dead in fire at mall hospital treating covid 19 patients fire brigade man save indian flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.