मुंबईत काेराेनाचे १ हजार १४५ रुग्ण, तर पाच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:07 AM2021-02-26T04:07:56+5:302021-02-26T04:07:56+5:30
मुंबई : मुंबईतील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील काही महिन्यांच्या तुलनेत मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी ...
मुंबई : मुंबईतील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील काही महिन्यांच्या तुलनेत मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १ हजार १४५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली.
मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख २२ हजार ८४३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत ११ हजार ४५८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात ४६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख १ हजार ५२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ८ हजार ९९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्के आहे. १८ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोरोनावाढीचा दर ०.२५ टक्के इतका आहे. २४ फेब्रुवारीपर्यंत मुंबईत कोरोनाच्या एकूण चाचण्या ३२ लाख ८ हजार ६८५ झाल्या आहेत. मुंबईतील दुप्पटीचा दर २७३ दिवस आहे.
.................................