आपली मुंबई श्रीमंत शहरांत जगात बाराव्या स्थानावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 03:53 PM2018-02-12T15:53:42+5:302018-02-12T15:54:18+5:30

या यादीत न्यूयार्क शहर प्रथम स्थानावर विराजमान असून येथील लोकांकडे तीन ट्रिलियन डॉलरची संपत्ती आहे.

mumbai-12th-richest-city-with-private-wealth-950-billion-dollars | आपली मुंबई श्रीमंत शहरांत जगात बाराव्या स्थानावर

आपली मुंबई श्रीमंत शहरांत जगात बाराव्या स्थानावर

Next

नवी दिल्ली - भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई जगातील श्रीमंत शहरामध्ये पह्लाय 15मध्ये आहे. नुकत्यात हाती आलेल्या एका अहवालामध्ये मुंबईनं श्रीमंत शहरामध्ये पॅरीस आणि टोरंटोसारख्या शहराला पछाडत 12वे स्थान पटकावलं आहे. या यादीत न्यूयार्क शहर प्रथम स्थानावर विराजमान असून येथील लोकांकडे तीन ट्रिलियन डॉलरची संपत्ती आहे. 2.7 ट्रिलियन डॉलरच्या संपत्तीसह लंडन दुसर्‍या, तर सॅनफ्रान्सिसको तिसर्‍या स्थानावर आहे. बीजिंग, शांघाय, सिडनी या शहरांचादेखील या यादीत समावेश आहे. 

न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार,  मुंबईची एकूण संपत्ती 950 अब्ज डॉलरची असून येथे 28 अब्जाधीश राहतात. तर टोरंटो (944 अब्ज डॉलर), फ्रँकफर्ट (912 अब्ज डॉलर) आणि पॅरिस (860 अब्ज डॉलर) यांची संपत्ती एवढी आहे. ही पाहणी करताना त्या-त्या शहरातील लोकांकडे असलेल्या खासगी संपत्तीचा उपयोग करण्यात आला आहे. त्यात मालमत्ता, रोख, शेअर्स, व्यवसाय आदींचा समावेश आहे. सरकारी निधी मात्र यातून वगळण्यात आली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अब्जाधीशांच्या यादीत मुंबई जगातील पहिल्या दहा शहरामध्ये येते. मुंबईत एकूण 28 अब्जाधीश राहतात. त्यांची संपत्ती एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त होते.  संपत्तीच्या वाढीबाबत पुढील दहा वर्षांत मुंबईचा वेगाने विकास होणार असून उद्योग, वित्तीय सेवा, रिअल इस्टेट आणि मीडिया या क्षेत्रांचे माहेरघर असल्याचे मुंबईबाबत न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालात म्हटले आहे.
 

Web Title: mumbai-12th-richest-city-with-private-wealth-950-billion-dollars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई