Join us

मुंबई १६ तर परभणी ७.६ अंशांवर, २५ डिसेंबरपर्यंत विदर्भात थंडीची लाट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 6:44 AM

Weather : गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. विदर्भात बऱ्याच भागात तर मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली.

मुंबई : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, मुंबईच्या किमान तापमानाचा पारा खाली घसरला आहे. मंगळवारी मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदविण्यात आले असून, या माेसमातील आतापर्यंतचा हा नीचांक आहे. तर राज्यात सर्वात कमी किमान तापमान परभणी येथे ७.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले.गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. विदर्भात बऱ्याच भागात तर मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.मुंबई आणि राज्यात ठिकठिकाणी किमान तापमान खाली घसरत असतानाच २५ डिसेंबरपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल, तर उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मुंबईचा विचार करता, बुधवारसह गुरुवारी येथील आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, १७ अंश नाेंदविण्यात येईल.

मंगळवारचे शहरांचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)परभणी ७.६, गोंदिया ७.८, पुणे ८.१, नाशिक ८.४, नागपूर ८.६, जळगाव ९, सातारा ९, औरंगाबाद ९.२, अकोला ९.६, नांदेड १०, वर्धा १०, बीड १०.१, वाशिम १०.२, चंद्रपूर ९.६, मालेगाव १०.२, महाबळेश्वर ११.३, सोलापूर १२.१, अमरावती १२.५, सांगली १२.६, कोल्हापूर १४.५, मुंबई १६ 

टॅग्स :मुंबईहवामान