मुंबई १६ तर माथेरान १७ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:07 AM2020-12-31T04:07:05+5:302020-12-31T04:07:05+5:30
आठवडाभर गारवा राहणार कायम लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईच्या किमान तापमानात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी १ अंशाची वाढ झाली. ...
आठवडाभर गारवा राहणार कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईच्या किमान तापमानात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी १ अंशाची वाढ झाली. मंगळवारी मुंबईचे किमान तापमान १५ अंश हाेते, बुधवारी ते १६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नाेंदविण्यात आले. माथेरानपेक्षा मुंबईत किंचित अधिक गारवा हाेता.
मुंबईच्या हवेत बुधवारी सकाळपासूनच गारवा होता. दुपारी गारव्याचे प्रमाण किंचित कमी झाले असले तरी सायंकाळी पुन्हा गार वाहू लागले होते. आठवडाभर मुंबईत असाच गारवा कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मुंबईसोबत ठाण्याच्या किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. बुधवारी ठाण्याचे किमान तापमान १८ अंश नोंदविण्यात आले.
* बुधवारचे शहरांचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
परभणी १४.७, जालना १५.९, औरंगाबाद १४.३, नांदेड १२, बीड १८.२, जळगाव १२, बारामती १४.९, पुणे १३.३, जेऊर १३, सांगली १८.३, सातारा १४.१, उस्मानाबाद १४.४, मालेगाव १३.२, नाशिक ११.८, मुंबई १६.८, ठाणे १८, रत्नागिरी १८.९, डहाणू १५.४, माथेरान १७.
------------------------------------------