मुंबई १६ अंशावर

By admin | Published: November 11, 2016 05:31 AM2016-11-11T05:31:11+5:302016-11-11T05:31:11+5:30

राज्यात थंडीने कहर केला असतानाच, आता मुंबईतही थंडीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. बुधवारसह गुरुवारी शहरातल्या रात्रीच्या गारव्यात वाढ झाली असून

Mumbai on 16th | मुंबई १६ अंशावर

मुंबई १६ अंशावर

Next

मुंबई : राज्यात थंडीने कहर केला असतानाच, आता मुंबईतही थंडीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. बुधवारसह गुरुवारी शहरातल्या रात्रीच्या गारव्यात वाढ झाली असून, किमान तापमानातील घसरणीमुळे मुंबईतला गारवा उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे. तर शुक्रवारी उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येईल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.
मराठवाड्याच्या काही भागात, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण-गोव्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबईच्या गारव्यात वाढ झाली आहे. किमान तापमान २२ वरून १६ अंशावर खाली घसरले आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या गार वाऱ्याचा वेग वाढल्यानंतर, राज्यात कडाक्याची थंडी पडणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mumbai on 16th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.