Join us

मुंबईत १७६६ रुग्ण झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबईत शुक्रवारी १४१६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर १७६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. परंतु, दिवसभरात ५४ रुग्णांचा ...

मुंबई : मुंबईत शुक्रवारी १४१६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर १७६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. परंतु, दिवसभरात ५४ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांचा आकडा आता १४ हजार ५२२ झाला आहे. रुग्णसंख्येत सतत घट होत असल्याने रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर आता आणखी कमी होऊन ०.२२ टक्के झाला आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही आता ३१७ दिवसांवर पोहोचला आहे.

आतापर्यंत मुंबईत सहा लाख ९५ हजार ८० रुग्णांची नोंद झाली आहे. यांपैकी सहा लाख ४९ हजार ३८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा आता कमी होऊन २९ हजार १०३ एवढा आहे. शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्या ५४ रुग्णांपैकी ३३ रुग्णांना सहव्याधी होत्या. मृतांमध्ये २१ पुरुष, तर सहा महिला रुग्णांचा समावेश होता. ३० मृत रुग्ण ६० वर्षांवरील होते, तर १८ रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते. ४० वर्षांखालील सहा रुग्णांचाही मृत्यू झाला आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढवून दिवसभरात ३३ हजार ७८ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत; तर आतापर्यंत ६० लाख १९ हजार ४२२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९६ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.