Join us

मुंबई १८ अंश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2020 5:41 PM

Mumbai 18 degrees : हंगामातला आतापर्यंतचा नीचांक

 

मुंबई : मुंबईसह राज्यात थंडीने थरकाप उडविला आहे. शनिवारी मुंबईचे किमान तापमान १८ अंश नोंदविण्यात आले असून, हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक कमी तापमान असल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. तर राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया येथे १०.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे.भारतीय  हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. ६ ते ९ डिसेंबर या कालावधीत गोव्यासह संपुर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. रविवारसह सोमवारी मुंबईचे किमान तापमान १८ अंशाच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील.-----------किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये.मुंबई १८.४पुणे ११.५जळगाव १२.६कोल्हापूर १७.७महाबळेश्वर १४.३मालेगाव १३.६नाशिक ११.१सांगली १६सातारा १३.३सोलापूर १४.४औरंगाबाद १३परभणी १०.६नांदेड १४अकोला १३.१अमरावती १४.४बुलडाणा १४.२चंद्रपूर १६गोंदिया १०.५नागपूर १२.४वाशिम १२.८वर्धा १३.४-----------येत्या २४ तासांत राज्यातील किमान तापमानात घट होईल. मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमान १२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल. पुणे आणि नाशिक येथील किमान तापमानातही घट होईल. मुंबईचे किमान तापमान १८ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल. राज्यात हळू हळू हिवाळा जाणवू लागला आहे. कृषीकरिता या हंगामात काय खबरदारी घ्यावी. शीत लहरीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठीचे उपाय याबाबत हवामान खात्याकडून माहिती पुरविली जात आहे.- कृष्णानंद होसाळीकर, उप महासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग

टॅग्स :हवामानमुंबईमहाराष्ट्र