Join us

मुंबई १८ अंश; थंडीची चाहूल लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 4:05 AM

गाेंदिया गारठले : सर्वाधिक कमी १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंदलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईचे किमान तापमान शनिवारी ...

गाेंदिया गारठले : सर्वाधिक कमी १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईचे किमान तापमान शनिवारी १८ अंश नोंदविण्यात आले असून, हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक कमी तापमान असल्याची नोंद हवामान खात्याने केली. तर राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया येथे १०.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. ६ ते ९ डिसेंबर या कालावधीत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. रविवारसह सोमवारी मुंबईचे किमान तापमान १८ अंशाच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील.

शनिवारचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

मुंबई १८.४

पुणे ११.५

जळगाव १२.६

कोल्हापूर १७.७

महाबळेश्वर १४.३

मालेगाव १३.६

नाशिक ११.१

सांगली १६

सातारा १३.३

सोलापूर १४.४

औरंगाबाद १३

परभणी १०.६

नांदेड १४

अकोला १३.१

अमरावती १४.४

बुलडाणा १४.२

चंद्रपूर १६

गोंदिया १०.५

नागपूर १२.४

वाशिम १२.८

वर्धा १३.४

* किमान तापमानात घट हाेणार

येत्या २४ तासांत राज्यातील किमान तापमानात घट होईल. मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमान १२ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येईल. पुणे आणि नाशिक येथील किमान तापमानातही घट होईल. मुंबईचे किमान तापमान १८ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल. राज्यात हळूहळू हिवाळा जाणवू लागला आहे.

- कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग