मुंबई १८ अंशांवर; थंडीची चाहूल लागली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 06:02 AM2020-12-06T06:02:57+5:302020-12-06T06:03:47+5:30
मुंबईचे किमान तापमान शनिवारी १८ अंशांवर नोंदविण्यात आले असून, हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक कमी तापमान असल्याची नोंद हवामान खात्याने केली. तर राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया येथे १०.५ अंश सेल्सिअस आहे.
मुंबई : मुंबईचे किमान तापमान शनिवारी १८ अंशांवर नोंदविण्यात आले असून, हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक कमी तापमान असल्याची नोंद हवामान खात्याने केली. तर राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया येथे १०.५ अंश सेल्सिअस आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, रविवारसह सोमवारी मुंबईचे किमान तापमान १८ अंशाच्या आसपास राहील.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ११.५, महाबळेश्वर १४.३, पणजी २२.७, जळगाव १२.६, कोल्हापूर १७.७, नाशिक ११.१, सातारा १३.३, अमरावती १४.४, रत्नागिरी २०.६, औरंगाबाद १३, चंद्रपूर १६, नागपूर १२.४, डहाणू १८.८. किमान तापमानात
घट हाेणार येत्या २४ तासांत राज्यातील किमान तापमानात घट होईल. मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमान १२ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविण्यात येईल. पुणे आणि नाशिक येथील किमान तापमानातही घट होईल.
मुंबईचे किमान तापमान १८ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल. राज्यात हळूहळू हिवाळा जाणवू लागला आहे.
- कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग