Mumbai: 'त्या' ५ आमदारांच्या अपात्रतेसाठी २ अर्ज, आठवडाभरात सुनावणी होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 08:41 AM2023-09-12T08:41:26+5:302023-09-12T08:42:26+5:30
Mumbai: अजित पवार गटातील आमदारांच्या अपात्रतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली असतानाच आता विधान परिषदेतील पाच आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उपसभापतींकडे दोन स्वतंत्र अर्ज केले आहेत.
मुंबई : अजित पवार गटातील आमदारांच्या अपात्रतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली असतानाच आता विधान परिषदेतील पाच आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उपसभापतींकडे दोन स्वतंत्र अर्ज केले आहेत. या अर्जावर आठवडाभरात सुनावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकीकडे शिवसेनेतील ५३ आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी १४ सप्टेंबरपासून सुरू होत असताना आता या नवीन याचिकांवरही अध्यक्ष आणि उपसभापतींना सुनावणी करावी लागणार आहे.
राष्ट्रवादीकडून विधानसभेतील २९, तर परिषदेतील पाच आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या अर्जात आमदार सतीश चव्हाण, अनिकेत तटकरे, विक्रम काळे आणि अमोल मिटकरी यांचा, तर पक्षाचे सरचिटणीस
५३ आमदारांची सुनावणी
शिवसेना शिंदे गटाच्या ३९ आमदारांची आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील सुनावणी १४ सप्टेंबरपासून विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात एकाच दिवशी ५३ आमदारांची सुनावणी घेतली जाणार आहे, त्यासाठी दोन्ही गटांच्या आमदारांना उपस्थित राहावे लागणार आहे. घटनेतील तरतुदीनुसार सुनावणी घेऊन कारवाई करू, असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अर्जात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचा उल्लेख केला आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन लवकरच आठवडाभरात सुनावणी घेतली जाणार आहे. त्यामुळे अजित पवार गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत उपसभापती कोणता निर्णय तात याकडे सर्वांचे लक्ष आहे.