मुंबईत २ लाख ९२ हजार ७२२ रुग्णांनी काेराेनाला हरवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:08 AM2020-12-31T04:08:22+5:302020-12-31T04:08:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत बुधवारी काेराेनाचे ५९४ रुग्ण बरे झाले, तर वर्षअखेरीस शहर, उपनगरात २ लाख ७२ ...

In Mumbai, 2 lakh 92 thousand 722 patients lost their lives | मुंबईत २ लाख ९२ हजार ७२२ रुग्णांनी काेराेनाला हरवले

मुंबईत २ लाख ९२ हजार ७२२ रुग्णांनी काेराेनाला हरवले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत बुधवारी काेराेनाचे ५९४ रुग्ण बरे झाले, तर वर्षअखेरीस शहर, उपनगरात २ लाख ७२ हजार ४६४ रुग्णांनी कोरोनाला हरविले. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्के झाला असून २३ ते २९ डिसेंबरपर्यंत एकूण कोविड वाढीचा दर ०.२१ टक्के असल्याची माहिती पालिकेच्या आराेग्य विभागाने दिली.

मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ३६१ दिवसांवर पोहोचला आहे. शहर, उपनगरात सध्या ८ हजार २९२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी दिवसभरात काेराेनाच्या ७१४ रुग्णांचे निदान झाले असून १३ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या २ लाख ९२ हजार ७२२ झाली असून मृतांचा आकडा ११ हजार १०७ आहे. आतापर्यंत कोरोनाच्या २३ लाख ४१ हजार २२ चाचण्या झाल्या आहेत.

शहर, उपनगरात झोपडपट्टी आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या २९० असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या २ हजार ५६१ आहे. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील ३ हजार ३०७ सहवासितांचा शोध घेतला आहे.

....................

Web Title: In Mumbai, 2 lakh 92 thousand 722 patients lost their lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.